Nagpur News : नागपूर शिक्षक घोटाळाप्रकरणी आणखी तिघांना अटक, तिघेही विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी

Nagpur Teachers Scam : आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनवण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

 प्रविण मुधोळकर, नागपूर 

नागपूर जिल्ह्यातील बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारावर अनुभव नसताना मुख्याध्यापकपदी मान्यता देऊन  शालार्थ आयडी तयार करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी तिघांना पोलिसांनी अटक केली. तिघेही आरोपी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अटक करण्यात आलेल्यांमध्ये कार्यालयातील अधीक्षक वर्ग दोन निलेश मेश्राम, उपनिरीक्षक संजय दुधाळकर, वरिष्ठ लिपिक सुरज नाईक यांचा समावेश आहे. या प्रकरणातील एकूण आरोपीची संख्या आता 5 वर पोहोचली आहे. यात लवकरच मुख्याध्यापकपदी नेमण्यात आलेल्या भंडारा जिल्ह्यातील काही अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश असल्याच्या अनुषंगानेही कारवाई केली जाईल अशी माहिती पुढे येत आहे.

(नक्की वाचा-  CM Devendra Fadnavis : शेतकऱ्यांना मोफत विजेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, म्हणाले...)

बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापकपदास मंजुरी दिल्याप्रकरणी नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीतून अटक करण्यात आली होती. तर या प्रकरणात भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मुख्याध्यापक पराग पुडके यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी मुख्याध्यापक पराग पुडके याला शिक्षक पदाचा अनुभव नसताना तसेच शिक्षक म्हणून कोठेही काम केले नसताना थेट मुख्याध्यापक बनवण्यात आले होते. बनावट शिक्षक नियुक्त प्रकरणात यापूर्वी  वेतन पथक आणि भविष्य निर्वाह निधी अधीक्षक निलेश वाघमारे यांना निलंबित केले आहे. शिक्षण नसताना पुडकेची मुख्याध्यापक म्हणून शालार्थ आयडी देण्यात आला. नरड आणि पुडके याला अटक केली आहे. यात आणखी कोण आरोपी आहे, या अनुषंगाने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी दिली आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  CIDCO News: गरीबांचे घर, श्रीमंतांचे दर ! सिडकोच्या वाढीव दरांविरोधात मनसेनं आता काय केलं पाहा)

नागपूर जिल्ह्यात 570 पेक्षा अधिक शिक्षण आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस शालार्थ आयडी बनवण्यात आल्याचा प्रकार 2019 पासून सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतरही बनावट कागदपत्रांच्या आधारे झालेल्या नियुक्त्यांचा तपास होणार का याकडे लक्ष लागले आहे.

Topics mentioned in this article