साई पालखीतल्या 3 जणांना भरधाव कारने चिरडले, आरोपी मात्र मोकाट

घोटी - सिन्नर दरम्यान एका भरधाव कारने पालखी बरोबर चाललेल्या साई भक्तांना जोरदार धडक दिली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.

Advertisement
Read Time: 2 mins
कल्याण:

अमजद खान 

टिटवाळा येथील मांडा परिसरातील तरूण साई पालखी घेऊन शिर्डीला पायी निघाले होते. त्यावेळी घोटी - सिन्नर दरम्यान एका भरधाव कारने पालखी बरोबर चाललेल्या साई भक्तांना जोरदार धडक दिली. त्यात तिघांचा मृत्यू झाला. या पैकी दोन जण हे सख्ये चुलत भाऊ आहेत. तिघांपैकी एक रविंद्र पाटील यांच्या घरी केवळ आई,पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या अपघातामुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर आरोपी मात्र फरार झाला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शिर्डीला वेगवेगळी मंडळ पालखी घेवून पायी  जात असतात. टिटवाळा येथील मांडा परिसरात ही साई सेवा मंडळ आहे. गेल्या २२ वर्षापासून या मंडळाचे सदस्य दरवर्षी साई पालखी घेऊन शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला जातात. यंदाही शनिवारी पालखी घेऊन मंडळाचे तरुण सदस्य शिर्डीला पायी निघाले होते. पायी चालत असताना घोटी ते सिन्नर दरम्यान एका भरधाव गाडीने पायी चालत असलेल्या साई भक्तांना धडक दिली. 

ट्रेंडिंग बातमी -  सर्व पक्षीय बैठकीला का गेलो नाही? शरद पवारांनी गुगली टाकली, सत्ताधारी क्लिनबोल्ड होणार?

या धडकेत रविंद्र उर्फ कवी सुरेश पाटील, भावेश राम पाटील आणि साईराज भोईर, सलमान पठाण हे जखमी झाले. त्यापैकी रविंद्र पाटील, भावेश पाटील आणि साईराज भोईर यांचा मृत्यू झाला आहे. सलमान पठाण हे जमखी आहेत. गावात तिघांच्या मृत्यूची बातमी कळताच शोककळा पसरली आहे. ही पालखी दरवर्षी शिर्डीला जाते. ही पालखी घेऊन जात असताना अपघात झाला. राखाडी रंगाच्या कारने ही धडक दिली. 

ट्रेंडिंग बातमी - 'गावा-गावातल्या लढाया बघत बसणार आहात का?' भुजबळांचा पवारांवर पलटवार

या अपघातात रविंद्र पाटील या तरूणाचा मृत्यू झाला. रविंद्र पाटील यांच्या पश्चात दोन मुली, आई, पत्नी असा परिवार आहे. ज्याने हा अपघात केला त्याला कठोर शिक्षा झाली पाहीजे अशी मागणी रविंद्र यांच्या कुटुंबाने केली आहे. दरम्यान या अपघाताला  16 तास उलटून गेले तरी आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यांना पोलिसांनी अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली.  

Advertisement