मराठा आणि ओबीसी आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठ फिरवली. त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले होते. मराठा आरक्षणाचे शरद पवारांना काही पडलेले नाही. अशी टिका करण्यात आली. ते फक्त राजकारण करत आहेत असा आरोपही करण्यात आला. त्यावर आता शरद पवारांनी पलटवार करत गुगली टाकली आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीची कोंडी तर झालीच आहे पण, त्यांनी टाकलेल्या गुगलीवर सत्ताधारी क्लिनबोल्ड होतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'बैठकीला का गेलो नाही'
मराठा आणि ओबीसी समाजात सध्या तणावाचे वातावरण आहे. असा स्थितीत योग्य मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला आपण गेलो नाही. त्यामागे काही कारणे होती असे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवालीत उपोषण केले. त्यावेळी त्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी सरकारमधले मंत्री गेले होते. शिवाय मुख्यमंत्रीही गेले. त्यानंतर जरांगेंनी उपोषण मागे घेतले. पुढे जरांगेंनी मुंबईच्या दिशेने कुच केली. त्यावेळीही मुख्यमंत्री जरांगेंना नवी मुंबईत भेटले. दोघांनी एकत्र येवून आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री यांनी जरांगें बरोबर काय चर्चा केली? त्यांना काय आश्वासने दिली? त्यातली किती पुर्ण झाली? याची माहिती सरकारने दिली नाही. दुसरीकडे ओबीसी नेत्यां बरोबरही सरकारमधील मंत्र्यांनी चर्चा केली. त्यांनीही त्यानंतर उपोषण मागे घेतले. त्यावेळी ओबीसी समाजाला सरकारने काय आश्वासन दिले होते हेही समोर आले पाहीजे. ते अजूनही समोर आले नाही. अशा स्थितीत चर्चा सरकार करणार, आश्वासन सरकार देणार मात्र तोडगा काढण्यासाठी विरोधकांना बोलवायचे हे शहाणपणाचे नव्हते असे शरद पवारांनी स्पष्ट केले. त्यामुळेच या बैठकीला गेलो नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
ट्रेंडिंग बातमी - जयंत पाटील यांचा पराभव का झाला?, शरद पवारांनी सांगितलं कारण
शरद पवारांची गुगली
शरद पवारांनी आता काही प्रश्न उपस्थित केले आहे. त्यामुळे सरकारच एक प्रकारे पवारांच्या गुगलीत गुरफटून जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. पवारांनी सरकारलाच आता प्रश्न उपस्थित केला आहे. की मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही काय आश्वासन दिले आहे. मराठा आरक्षणा बाबत तुम्ही त्यांना कोणती कमिटमेंट केली आहे. त्यामुळे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित केले. त्यांच्या या प्रश्नामुळे आता सरकारचीच कोंडी होणार आहे. शिवाय ओबीसी समाजालाही शिंदे सरकारच्या मंत्र्यांनी काय आश्वासन दिले त्यामुळे त्यांनीही उपोषण मागे घेतले हे समजले पाहीजे अशी पवारांची मागणी आहे. त्यामुळे या दोन्ही समाजाला या आधी झालेल्या चर्चांमध्ये सरकारने काय आश्वासने दिली आहेत हे सरकारला सांगावे लागेल. त्यामुळे सरकारचीच एक प्रकारे कोंडी होणार आहे अशी चर्चा झाली आहे. शिवाय पवारांनी टाकलेल्या गुगलीत सरकारचा क्लिनबोल्ड होतो की काय असेही बोलले जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांना घरात जागा, पण पक्षात... शरद पवारांचं सूचक वक्तव्य
भुजबळांबरोबर चर्चा काय?
छगन भुजबळ भेटीसाठी आले होते असे शरद पवार म्हणाले. त्यावेळी अंगात ताप होता. त्यामुळे सुट्टी घेतली होती. पण आपल्याला उठवण्यात आले. भुजबळ भेटण्यासाठी आले आहेत असे सांगण्यात आले. त्यांना विचारलं किती वेळ झाला. त्यावर एक तासापासून ते बसले आहेत असे सांगितले. शिवाय भेटल्या शिवाय जाणार नाही असे ही ते म्हणत होते. त्यानंतर मी त्यांना भेटलो असे पवारांनी सांगितले. याभेटीत त्यांनी मध्यस्थी करण्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे म्हणणी ऐकून घेतल्याचे पवारांनी सांगितले. पुढे भुजबळांची हल्लीची भाषणं फार छान झाली.ते बऱ्याच गोष्टी बोलले. बीड, बारामतीत चांगल्या प्रकारचे भाषण केली.माझ्याबद्दलही आगपाखड केली. हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world