Thane News: लाखो रुपयांची लाच घेणाऱ्या शंकर पाटोळेमुळे ठाणे महापालिकेचा कँटीन चालक टेन्शनमध्ये, 17 हजार रुपये

Thane news: एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला 17 हजार रुपयांचे बिल देणे अवघड नव्हते. यातून त्यांच्या पैशांसाठीचा हव्यास दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

रिजवान शेख, ठाणे

Thane News: ठाणे महापालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांना नुकतेच 25 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) अटक करण्यात आली होती. शंकर पाटोळे यांच्यावर लाचखोरीचा आरोप असतानाच आता त्यांचा आणखी एक 'कारनामा' उघडकीस आला आहे. गेल्या महिनाभरापासून त्यांनी महापालिकेच्या कॅन्टीनचे तब्बल 17 हजार रुपयांचे जेवणाचे बिल थकवले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पाटोळे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी त्यांना तीन वेळा जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला गेला, पण प्रत्येक वेळी न्यायालयाकडून त्यांचा जामीन अर्ज नाकारला आहे. लाचखोरीचा आरोप असलेल्या या अधिकाऱ्याची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

(नक्की वाचा-  Nashik Digital Arrest: 'सुप्रीम कोर्टात हजर व्हा अन्यथा..', एका कॉलने आयुष्य उद्ध्वस्त, कोट्यवधींची लूट)

एकीकडे 25 लाख रुपयांची लाच घेण्याच्या आरोपाखाली पाटोळे यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांचे 17 हजार रुपयांचे कॅन्टीनचे बिल थकीत असल्याचा प्रकार समोर आला आहे.  एवढ्या मोठ्या रकमेची लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला 17 हजार रुपयांचे बिल देणे अवघड नव्हते. यातून त्यांच्या पैशांसाठीचा हव्यास दिसून येत आहे.

(नक्की वाचा-  High Court on Potholes Deaths : खड्ड्यांमुळे मृत्यू, वारसांना मिळणार मोठी रक्कम; उच्च न्यायालयाचे आदेश)

कॅन्टीन मालक थकबाकीच्या प्रतीक्षेत

ठाणे महापालिकेच्या कॅन्टीनचा ठेकेदार गेल्या महिनाभरापासून आपल्या बिलाच्या 17 हजार रुपयांच्या थकबाकीची वाट पाहत आहे. हा अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्यानंतर आता त्याला हे पैसे कधी आणि कसे मिळणार, याबद्दल त्याला चिंता लागली आहे. कॅन्टीन मालकासाठी 17 हजार रुपये ही एक मोठी रक्कम आहे आणि ती वसूल करण्यासाठी त्याला आता संघर्ष करावा लागत आहे. आता पाटोळे सुटकेनंतर ते हे बिल भरणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article