Nashik Winter Update: राज्यभरात मागील काही दिवसांपासून थंडीची लाट पसरली आहे. नाशिकमध्येही तापमानाचा पार चांगलाच घसरला आहे. नाशिककर बोचऱ्या थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे तर ठिकठिकाणी शेकोटी समोर बसलेले पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये थंडीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. तापमानाचा पारा 8.9 अंशाच्या खाली गेला असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. गेल्या चार ते पाच तापमानात ही घट नोंदवली गेली आहे.
(नक्की वाचा: आली लहर केला कहर! उद्योगपतीने खाल्लं तब्बल 53 कोटी रुपयांचं एक केळं)
उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नाशकात थंडीचा कडका वाढला आहे. हिमालयातील बर्फवृष्टीमुळे बहुतांश राज्यांमध्ये सरासरी तापमानात घसरण झाली आहे. याचा परिणाम नाशिक जिल्ह्यासोबत राज्यातील हवामानावरही होत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही तापमानाच्या पाऱ्यात लक्षणीय घट झाली आहे. नाशिकमध्ये नागरिकांना थंडीच्या बचावासाठी रात्री शेकोटीचा सहारा घ्यावा लागत आहे. निफाडच्या ओझरमध्ये दोन ते तीन दिवसात तापमान 8 अंश सेल्सिअसवरून थेट 5.4 अंशावर आले आहे. राज्यात 1 डिसेंबरपर्यंत थंडीची तीव्रता कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
(नक्की वाचा:मास्क आधारकार्ड डाउलोड करा, फसवणुकीचा धोका टाळा!)
दरम्यान राज्यातील कोकण-गोवा , मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये राज्यात तापमानाचा चढ-उतार पाहायला मिळू शकतो.