Panvel News: मधमाशांनी घात केला; कर्नाळा किल्ला फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू

Panvel News : मधमाशांनी केलेल्या हल्ल्यातून पळून जाताना संदीप पुरोहित यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Man dies in bees attacked:  पनवेलमधील कर्नाळा किल्ला फिरायला गेलेल्या एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.  मधमाशांनी केलेल्या हल्ल्यातून पळून जाताना संदीप पुरोहित यांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. संदीप हे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रहिवासी होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार या घटनेत मुंबईतील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांसह 8 जण जखमी झाल्याचीही माहिती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्मचारी आणि निसर्ग मित्र या स्वयंसेवी संस्थेचं बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं.

(नक्की वाचा: Mumbai News: 'आपणच आपली ठासून घेतो...', मराठी अभिनेता भयंकर संतापला; VIDEO व्हायरल)

कर्नाळा पक्षी अभयारण्यातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, "सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आम्हाला किल्ला परिसरातून फोन आला. मधमाशांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचं आम्हाला सांगण्यात आल. घटनास्थळी पोहोचण्यासाठी आम्हाला सुमारे 45 मिनिटे लागली. मधमाशांच्या चाव्याने अनेकजण जखमी झाले होते. एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळली."

(नक्की वाचा - Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)
 
मिळालेल्या माहितीनुसार, मधमाशांच्या हल्ल्यानंतर संदीप पुरोहित यांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. धावताना ते जमिनीवर कोसळले. यावेळी त्यांच्या डोक्याला इजा झाला. बचाव पथकाने त्यांना तातडीने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

Topics mentioned in this article