रेवती हिंगवे, पुणे
Pune Traffic Jam : पुण्यातील बहुप्रतीक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरपर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपूल महाराष्ट्र दिनी पुणेकरांसाठी खुला झाला आहे. वाहतूक कोंडी कमी होण्यासा मदत होईल, यासाठी सिंहगड उड्डाणपूल महत्त्वाचा मानला जात होता. मात्र सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची सुटका होण्याचं नाव घेत नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुण्यात नव्याने उद्घाटन झालेल्या सिंहगड उड्डाणपुलावर देखील मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. सिंहगड रोडवर असणाऱ्या नवीन उड्डाणपुलावर वाहनांचा लांबच लांब रांग शुक्रवारी रात्री दिसली. त्यामुळे पुणेकरांचा हिरमोड झाला.
(नक्की वाचा- Ladki Bahin Yojna: 'लाडकी बहीण' योजनेचा सामाजिक न्याय विभागाला फटका; शेकडो कोटींचा निधी वळवला)
Pune Sinhgad Flyover
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडी सुटावी म्हणून 1 मे रोजी अजित पवारांच्या हस्ते या नव्या पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र काल रात्री पुन्हा त्याच उड्डाणपुलावर पुणेकर अडकून पडले. सिंहगड रोड पुलामुळे नागरिकांचा प्रवासाचा अर्धा तास कमी होणार आहे, असा दावा अजित पवारांनी केला होता. मात्र वाहतूक कोंडी पुणेकरांचा पाठलाग सोडण्यास तयार नसल्याचं दिसून आलं.
(नक्की वाचा- Crime News : पैशांची हाव, वकिलाने थेट न्यायालय आणि पोलिसांनाच फसवलं; काय आहे प्रकरण?)
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. राजाराम पूल ते फनटाइमपर्यंतचा हा उड्डाणपूल शहरातील सर्वाधिक लांबीचा हा उड्डाणपूल आहे. फनटाइम ते विठ्ठलवाडी आणि राजाराम पूल ते फनटाइम असा दोन्ही बाजूला हा उड्डाणपूल आहे.