Samruddhi Mahamarg Toll Hike : समृद्धी महामार्गावरील प्रवास महागला, 1 एप्रिलपासून टोलच्या दरात वाढ

Samruddhi Mahamarg Toll News : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या कंपनीने ही माहिती दिली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

प्रविण मुधोळकर, नागपूर

Samruddhi Mahamarg toll News: मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास महागणार आहे. समृद्धी महामार्गावरील टोल दरात 1 एप्रिलपासून वाढ होणार आहे. 1 एप्रिलपासून कार आणि एलएमव्ही (लाईट मोटर व्हेइकल) साठी प्रति किलोमीटर 2.06 रुपये टोल आकारला जाईल. मिनी ट्रक आणि मिनी बससाठी 3.32 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारला जाणार आहे.  

तर दोन एक्सेल असलेल्या म्हणजेच चार किंवा सहा चाकांच्या बस आणि ट्रकसाठी 6.97 रुपये प्रति किलोमीटर टोल निश्चित करण्यात आला आहे. कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी किंवा ट्रेलरसाठी 10.93 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारला जाईल. तर सात किंवा त्याहून अधिक एक्सेल असलेल्या वाहनांसाठी 13.30 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारण्यात येणार आहे.  

येत्या 1 एप्रिल 2025 पासून 31 मार्च 2028 पर्यंत ही टोल वाढ लागू असणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) आणि नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे लिमिटेड या कंपनीने ही माहिती दिली आहे.

Topics mentioned in this article