Trending News: मुंबईत परदेशी तरुणीची छेड काढणारे 'बिहारी', जगात बदनामी, Video Viral होताच दोघे जेरबंद

त्यानंतर तिने तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. तो व्हिडीओ व्हायरल ही झाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • मुंबईत परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात, पण काहींना येथे वाईट अनुभवही येतात
  • धोबीघाट परिसरात परदेशी महिलेची दोन तरुणांनी छेडछाड केली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला
  • या दोघा तरुणांना पोलिसांनी शोधून पकडले असून त्यांची चौकशी केल्यानंतर ते बिहारी असल्याचे स्पष्ट झाले आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

पर्यटक मुंबईत मोठ्या प्रमाणात फिरण्यासाठी येत असतात. त्यात परदेशी पर्यटकांची संख्या मोठी असते. मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे त्याबाबतचे आकर्षण जगभरातल्या पर्यटकांना आहे. पण काही पर्यटकांना याच मुंबईत वाईट अनुभव येतात. ते अनुभव ते आपल्या सोशल मीडियावर शेअर करतात. त्यातून मुंबईच बदनामी होते. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला होता. धोबीघाट परिसरात फिरणाऱ्या एका परदेशी महिलेची दोन तरुणांनी छेड काढली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मुंबईबाबत यावर नकारात्मक प्रतिक्रीया उमटत होत्या. शेवटी त्या दोन तरुणांना पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर ते दोघे ही बिहारी असल्याचं समोर आलं आहे.

परदेशी तरुणीची छेडछाड करणारे कोण होते हे शोधून काढणे पोलीसां समोर आव्हान होते. शिवाय तो व्हिडीओ भारतातच नाही तर परदेशात ही व्हायरल झाला होता. त्यात मुंबईची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली.अशा स्थितीत पोलीसांवर ही मोठा दबाव होता. शेवटी पोलीसांनी त्या दोन तरुणांना शोधून काढलं आहे. आगरीपाडा पोलिसांनी त्यासाठी टीम बनवल्या होत्या. त्या टीमने या दोघांना पकडले आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर ते दोघे ही बिहारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. ते बिहार इथून कामासाठी मुंबईत आले होते. मुळचे ते बिहारचे आहे. मात्र काम धंदा करण्यासाठी मुंबईत आले होते. पण त्यांच्या एका कृतीने मुंबईचे नाव बदनाम झाले होते. 

नक्की वाचा - Mumbai News : 'तो मुंबईचा नाही'; परदेशी तरुणीसोबत घृणास्पद कृत्य करीत देशाला लाज आणणाऱ्याचं सत्य उघड

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ मुंबईच्या महालक्ष्मी इथल्या धोबीघाट परिसरातील होता. इथं एक परदेशी तरुणी फिरण्यासाठी गेली होती. या धोबीघाटावर परदेशी पर्यटक नेहमीच दिसतात. त्यामुळे ही तरूणी ही तिथे फिरण्यासाठी गेली होती. त्याच वेळी हे दोघे तरुणी तिथे होते. त्यांनी पहिले या तरुणीची छेडछाड केली. त्यानंतर तिचा लाठलाग सुरू केला. त्या तरुणीने या दोघांना हटकले ही होते पण त्यांनी तिचे काही एक ऐकले नाही.शिवाय सेल्फी काढण्याच्या बहाण्याने ते तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्व तिने आपल्या व्हिडीओ रेकॉर्ड केले.

नक्की वाचा - VIDEO: अभिनेत्री विशाखा सुभेदारचा मुलगा युद्धभुमीत अडकला! रडत रडत मागितली मदत, '4 दिवसांपासून तो'

त्यानंतर तिने तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. तो व्हिडीओ व्हायरल ही झाला. त्यात भारताबाबत त्यातही मुंबईबाबत अनेक वाईट कमेंट येत होत्या. ऐवढेच नाही तर  अनेक परदेशी पर्यटकांनी तिला मुंबईला न जाण्याचा सल्लाही दिला होता. भारता मुंबईत जावू नकोस असं ही तिला या व्हिडीओतून सांगितलं गेलं. यातून मुंबई आणि भारताची बदनामी झाली. या व्हिडीओ झालेला सर्व प्रकार त्या तरुणीने सांगितला. जवळपास 15 मिनिटे ते माझा पाठलाग करत होते असा दावा ही तिने या व्हिडीओतून केला आहे. पहिले एक तरुण तिच्या मागे लागला होता. नंतर त्याने आपल्या मित्राला ही बोलवून घेतलं असं तिने म्हटलं आहे. 

Advertisement