जाहिरात

Mumbai News : 'तो मुंबईचा नाही'; परदेशी तरुणीसोबत घृणास्पद कृत्य करीत देशाला लाज आणणाऱ्याचं सत्य उघड

या प्रकरणानंतर अनेकांनी तिला भारतात त्यातही मुंबईत न जाण्याचा सल्ला दिला. या प्रकरणामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Mumbai News : 'तो मुंबईचा नाही'; परदेशी तरुणीसोबत घृणास्पद कृत्य करीत देशाला लाज आणणाऱ्याचं सत्य उघड

foreign girl Harassed : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ धोबीघाट परिसरातील होता. यामध्ये एका परदेशी तरुणीसोबत दोन तरुण छेडछाड करीत असल्याचं दिसत होतं. हे तरुण महिलेचा पाठलाग करीत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारताबाबत त्यातही मुंबईबाबत अनेक वाईट कमेंट येत होत्या. अनेक परदेशी पर्यटकांनी तिला मुंबईला न जाण्याचा सल्लाही दिला होता. दरम्यान या आरोपी तरुणाला अखेर अटक करण्यात आली आहे.


एका आरोपीला अटक....

मुंबईच्या धोबीघाट परिसरात परदेशी महिलेची छेड काढल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हा तरुण सेल्फी घेण्यासाठी परदेशी तरुणीचा पाठलाग करीत होता. तब्बल १५ मिनिटं हा तरुणीचा पाठलाग करीत असल्याचं तिने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे. सुरुवातील एक तरुण तिचा पाठलाग करीत होता.

थोड्या वेळाने त्याने मित्राला बोलावलं आणि अशी दोघंजण सेल्फीसाठी तिच्या मागे मागे जात होते. दरम्यान त्यातील एकाला अटक झाली असून एकाचा शोध घेतला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे आरोपी हा मुंबईकर नाही. दोघेही  परराज्यातील असून कामानिमित्त मुंबईत राहतात. अटक केलेल्या आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

नक्की वाचा - Badlapur News : लेकीच्या कृत्याने आई-वडिलांना रडू कोसळलं; आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शहराध्यक्षपदाचा राजीनामा

अनेकांनी भारतात न जाण्याचा दिला सल्ला...

धक्कादायक बाब म्हणजे तरुणीने पोस्ट केलेल्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये अनेकांनी तिला भारतात पर्यटनासाठी न जाण्याचा सल्ला दिला. तर काहींनी महाराष्ट्रात न जाता केरळला जा असंही सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com