Mumbai News: बाईईई! मुंबईतील 78 मजली Trump Tower च्या फ्लॅटचं भाडं किती? किंमत पाहून गावीच जाल

मुंबईतील वरळी परिसरातील Trump Towers मधील एक अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Trump Tower Flat Rent
मुंबई:

Mumbai Trump Tower 1 Month Rent :  मुंबईतील वरळी परिसरातील Trump Towers मधील एक अल्ट्रा-लक्झरी अपार्टमेंट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या फ्लॅटचे दरमहा भाडे 10 लाख रुपये आहे. या फ्लॅटच्या भाड्याची किंमत ऐकताच इंटरनेटवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. ही रक्कम ऐकून काही जण थक्क झाले आहेत, तर काहींनी यावर मजेशीर कमेंट्स दिल्या आहेत. 

4.5 BHK फ्लॅटकडे सर्वांचच लक्ष

हा व्हिडिओ रिअल इस्टेट कंटेंट क्रिएटर रवी केवालरामानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडीओत दाखवलेला हा फ्लॅट ट्रम्प टॉवर्सच्या वरच्या मजल्यांवर आहे.त्याचा कार्पेट एरिया जवळपास 2900 चौरस फूट असल्याचं सांगितलं जात आहे. 

फ्लॅटची काय आहे खासीयत?

हा 4.5 BHK फ्लॅट सेमी फर्निश्ड असून यामध्ये अनेक प्रिमियम सुविधाही आहेत. 
4 बेडरूम आणि प्रत्येकासोबत अटॅच बाथरूम

नक्की वाचा >> अंबरनाथमध्ये भाजपला धोबीपछाड! अजित पवार गटालाही धक्का, शिंदेंची स्मार्ट खेळी, किती नगरसेवक फोडले?

  • स्वतंत्र पावडर रूम 
  • स्टाफ रूमसह वॉशरूम
  • स्वतंत्र युटिलिटी एरिया
  • मार्बल फ्लोरिंग
  • मॉड्युलर किचन कॅबिनेट्स
  • प्रीमियम बाथरूम फिटिंग्ज
  • डबल-पॅन विंडोज
  • एअर कंडिशनिंग

या फ्लॅटमध्ये अनेक आरामदायी सुविधा आहेत. पण या फ्लॅटचे भाडे 10 लाख असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. काही लोकांनी या फ्लॅटला खूप पसंती दर्शवली आहे.तर काहींनी या महागड्या फ्लॅटच्या भाड्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसच काही उणिवांकडेही लक्ष वेधलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> The Raja Saab Review : फिल्म इंडस्ट्रीवर करतोय 'राज', कसा आहे प्रभासचा 'द राजा साहब?' वाचा करेक्ट रिव्ह्यू

  • सी-व्ह्यू नाही,
  • बाल्कनी नाही,
  • सीलिंग हाइटदेखील अपेक्षेइतकी प्रभावी नाही.

एका यूजरने कमेंट करत म्हटलंय की,  “सी-व्ह्यू नाही यार… दुसरा दाखवा.”, अन्य एका यूजरने म्हटलं, 
“या प्राइस पॉइंटवर सीलिंग हाइट अधिक चांगली असायला हवी होती.”

सामान्य लोकांचं वास्तवही समोर आलं

एकाने भन्नाट कमेंट करत म्हटलं, “मी हा व्हिडिओ माझ्या अकाउंटमध्ये उरलेल्या 289 रुपयांसह पाहत आहे.”अशा प्रकारे Trump Towersचा हा फ्लॅट लक्झरीपेक्षा इंटरनेट ह्यूमरचा भाग बनला आहे. या फ्लॅटचे भाडे पाहून मुंबईतील वाढत्या रेंट कल्चरबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. “खरंच एवढ्या मोठ्या रक्कमेच्या बदल्यात हे सगळं योग्य आहे का?”असाही प्रश्न काही लोकांना पडला आहे. 

Advertisement