जाहिरात

The Raja Saab Review : फिल्म इंडस्ट्रीवर करतोय 'राज', कसा आहे प्रभासचा 'द राजा साहब?' वाचा करेक्ट रिव्ह्यू

प्रभास आणि संजय दत्त स्टारर द राजा साहब चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट नेमका कसा आहे? वाचा या चित्रपटाचा रिव्ह्यू..

The Raja Saab Review : फिल्म इंडस्ट्रीवर करतोय 'राज', कसा आहे प्रभासचा 'द राजा साहब?' वाचा करेक्ट रिव्ह्यू
The Raja Saab Review
मुंबई:

The Raja Saab Review : चित्रपटाची कथा राजू (प्रभास)या पात्राने सुरु होते. जो त्याची आजी(झरीना वहाब) यांच्यासोबत राहतो. आजीला स्मृतीभंशाचा आजार असतो. तसच ती पती (संजय दत्त) अचानक गायब होण्याचा दु:खात जगत असते. ती नातू राजूला म्हणते “माझ्या आजोबांना शोधून आण”. यासाठी ती राजूकडे हट्टपणाही करते.याच ठिकाणाहून राजूच्या प्रवासाची कथा सुरु होते. हा प्रवास खूप हॉन्टेड टाईप असतो आणि त्यात मोठं रहस्य लपलेलं असतं. राजू एका हॉन्टेड हवेलीत पोहोचतो तेव्हा त्याल आजोबांबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी समजतात.आजोबांचे निधन झाले आहे आणि ते आता भूत बनले आहेत, अशी माहिती समोर येते.आता राजूला त्याच्या मित्रांच्या मदतीने भूताचा सामना करावा लागणार आहे. तसच त्याला हवेलीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधावा लागणार आहे.

या चित्रपटात सस्पेन्स काय?

आजोबांचे कोणते रहस्य लपलेले आहे?
राजू या परिस्थितीतून कसा मार्ग काढेल?
आणि तो सुरक्षितपणे हवेलीच्या बाहेर पडू शकेल का?

नक्की वाचा >> PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 कधी जमा होणार? 22 व्या हफ्त्याबाबत समोर आली मोठी अपडेट

चित्रपटातील कंटाळवाणे सीन्स

चित्रपटाची कथा खूपच गोंधळणारी वाटते. चित्रपटात एखादं पात्र कुठून आलं आणि बाकी पात्रांशी त्याचा काय संबंध आहे,हे अनेकदा स्पष्ट होत नाही. निधी कुमार हे पात्र याचं मोठं उदाहरण आहे. स्क्रिप्टमध्ये इतके टर्निंग पॉईंट्स आहेत की, एका सीनमधून दुसऱ्या सीनपर्यंत कथा जोडलीच जात नाही,असं वाटतं.हे सगळं इतकं अचानक कसं घडलं? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होतो. उदा. मालविकाचं पात्र अचानक प्रभासपर्यंत पोहोचणं. प्रभासच्या दक्षिण भारतीय चाहत्यांचा विचार करून स्टोरी लिहिल्याचं स्क्रीनप्ले मध्ये जाणवतं. हिरोइझमने भरलेले सीन सतत येत राहतात,पण त्यांचा काहीच परिणाम दिसत नाही. तसच नवीन काही अनुभवताही येत नाही.

फिल्मला हॉरर-कॉमेडी म्हटलं आहे,पण या चित्रपटात ना भीती आहे, ना कॉमेडी..अनेक पात्रे फक्त एक-दोन सीनमध्ये दिसतात. कथेशी काहीही संबंध नसतो आणि त्या मजेशीर किस्सेही नाहीत. बॅकग्राऊंड स्कोअर आवश्यकता पेक्षा जास्त आणि त्रासदायक आहे.दिग्दर्शक मारुती यांचे दिग्दर्शनही अप्रतिम वाटत नाही. चित्रपट खूप जास्त प्रमाणात शूट केला आहे आणि नंतर सीन्स कट करून जोडला गेला आहे, ज्यामुळे एडिटिंग विखुरल्यासारखं वाटतं. या चित्रपटात तीन-तीन अभिनेत्री आहेत. पण कोणतंही पात्र खास असल्यासारखं वाटत नाही.

नक्की वाचा >> किंग खानसोबत 1 चित्रपट, 50000 कोटींची मालकीन, श्रीमंतीत जुही चावलालाही मागे टाकलं, 'ती' मराठी अभिनेत्री कोण?

चित्रपटातील चांगल्या गोष्टी 

मोठ्या स्टार्सचा चित्रपट असल्याने त्याची प्रॉडक्शन व्हॅल्यू उत्कृष्ट आहे. झरीना वहाब यांनी या चित्रपटात छाप टाकली आहे. त्याचं पात्र खूप प्रभावशाली वाटतं. हिंदी सिनेमात त्यांना अभिनयाच्या खूप जास्त संधी का दिल्या गेल्या नाही,याची उणिव जाणवते. राणी गंगा मातेची भूमिका असो किंवा एखाद्या साध्या आजीचे पात्र, त्या प्रत्येक सीनमध्ये उठून दिसतात.संजय दत्त त्यांच्या भूमिकेत पूर्णपणे फिट बसतात. त्यांचा अभिनय पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध होऊ शकता.चित्रपटात असे अनेक मसालेदार घटक आहेत,ज्यावरून स्पष्ट जाणवते की हा एक ठराविक फॉर्म्युला आणि पॅटर्नवर तयार करण्यात आलेला चित्रपट आहे.दक्षिणेकडील दिग्दर्शकांनी आता हे समजून घेणे आवश्यक आहे की प्रेक्षकांना पूर्वी ज्या गोष्टीमुळे चित्रपट यशस्वी व्हायचे,त्या गोष्टी पुन्हा पुन्हा समोर आणायच्या नाहीएत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com