Mumbai News : कांदिवलीमध्ये गुजराती टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने तिच्या 14 वर्षांच्या मुलाला ट्यूशनला जाण्यास सांगितले तेव्हा मुलगा संतापला आणि त्याने 57 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. कांदिवली पोलिसांनी ADR दाखल करून पुढील तपास करत आहेत.
(नक्की वाचा- Ahilyanagar News : महिलांना आमिष देऊन ढाबा, बारमध्ये नाचवायचा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)
कांदिवली पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गुजराती टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री कांदिवली येथील 'सी ब्रूक' इमारतीत तिच्या कुटुंबासह राहत होती. बुधवारी तिने तिच्या मुलाला ट्यूशन क्लासला जाण्यास सांगितले होते. परंतु मुलाने ट्युशनला जाण्यास नकार दिला. यावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. यानंतर अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या 57 व्या मजल्यावर उडी मारली.
एवड्या उंचीवरून पडल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला. अभिनेत्रीचा तो एकुलता एक मुलगा होता असे सांगितले जात आहे. घटनेनंतर काही वेळाने इमारतीच्या चौकीदाराने पंत इमारतीवरून खाली पडल्याचे सांगितले. त्यानंतर जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला.
(नक्की वाचा- Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले)
घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा तयार केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. परंतु आत्महत्येमागील खरे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस इमारतीत बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील तपासत आहेत. पोलिसांनी सांगितले की कुटुंबाकडून काहीही संशयास्पद नाही परंतु तरीही पोलिस अधिक तपास करत आहेत.