अमजद खान, कल्याण
गुजरातमधून येऊन ठाणे आणि पालघर जिल्ह्यात चैन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीच्या दोन चोरट्यांना कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीच्या दोन चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत. कन्नूभाई सोलंकी आणि शरीफ खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. तर जिग्नेश घासी आणि जसवंत मीना या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिम येथील पौर्णिमा चौक परिसरात एका महिलेची चैन चोरुन चोरटे पसार झाल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या प्रकरणात कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरु केला. कल्याणचे उपायुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शानाखाली विकास मडके यांनी यांनी तपास सुरु केला.
(नक्की वाचा - Road Accident : भाजपच्या माजी आमदारांच्या नातवाचा भीषण अपघातात मृत्यू, केचे कुटुंबावर दु:खाचा डोंगर)
पोलिसांना माहिती मिळाली की, काही चोरट्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर या आरोपींना कल्याणला आणले गेले. पोलीस तपासात जो खुलासा झाला तो धक्कादायक आहे. गुजरातमधील हिम्मतनगरमधील कन्नूभाई सोलंकी आणि जिग्नेश घासी हे दोघे कडियाचे काम करतात. काम केल्यावर काही दिवसांची सुट्टी घेतात. सुट्टी घेऊन ते वसई येथील मित्राच्या घरी येतात. त्यांचा मित्र शरीफ खान हा एका खाजगी कंपनीत कामाला आहे. त्याच्या घरी राहून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात चैन स्नॅचिंग करतात.
(नक्की वाचा- Smartwatch Feature: स्मार्टवॉच सोडवणार सिगारेट ओढण्याचं व्यसन, काय आहे नवी टेक्नोलॉजी?)
लूटीच्या माल हा जयवंत विकतो. जे पैसे मिळतात, ते चौघे वाटून घेतात. ते पुन्हा त्यांच्या गावी निघून जातात. या प्रकरणात कन्नभाई आणि शरीफ खानला अटक झाली आहे. जिग्नेश आणि शरीफ फरार असून महात्मा फुले पोलीस दोघांचा शोध घेत आहेत. चेन स्नॅचिंग करणाऱ्या या टोळीने आतापर्यंत केली आहे. या चोरट्यांना आतापर्यंत 20 गुन्ह्याची माहिती समोर आली आहे. अजून काही गुन्हे उघडकीस शक्यता आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.