Pune News : ग्राहकांना दोन हेल्मेट देणं अनिवार्य, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश

पुण्यात दुचाकी विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 1 min

पुण्यात दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या अशा दोघांनीही हेल्मेट घालावे यासाठी पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नवी क्लृप्ती शोधून काढली आहे. पुण्यात दुचाकी विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नवी दुचाकी विकताना ग्राहकांना दोन हेल्मेट देणे आता अनिवार्य राहणार आहे. 

रस्त्यावरील होत असणाऱ्या सततच्या अपघातांमुळे होणाऱ्या जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे यापुढे शोरूममधून दुचाकीची विक्री करणाऱ्यांना दोन हेल्मेट देणं बंधनकारक ठरणार आहे. मात्र यामुळे दुचाकींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  

नक्की वाचा - Pune Traffic : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुण्यात 'रडार', नव्या वर्षात पोलिसांची नवी उपाययोजना

वाढणाऱ्या गाड्यांची संख्या आणि वाहतुकीची कोंडी पाहता गाड्यांसंदर्भातील नियम अधिक कडक करणं आवश्यक आहे. त्यासाठी आता पुण्यातील दुचाकीस्वारांसह मागे बसणाऱ्यांनी हेल्मेट नियमित घालावे यासाठी पुणे परिवहन विभागाने मोठे आदेश दिले आहेत.  

Advertisement