पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी 'रडार तंत्रज्ञाना'चा वापर करण्यात येणार आहे. कोणत्या रस्त्यावर दुचाकी, बस, चारचाकी किती आहेत, याचा अभ्यास केला जाईल. एखाद्या भागात वाहतुकीचा वेग किती आहे, वाहतूक सुरळीत आहे की नाही, याबाबतची माहिती समजण्यास मदत होणार असून, त्याद्वारे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वाहतूक कोंडी हा जटिल प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी पोलिसांकडून उपाययोजना करण्यात येणार आहेत. यात कोंडीची ठिकाणे निश्चित करणे, प्रमुख चौकातील सिग्नल यंत्रणेचे सुसूत्रीकरण, तसेच वाहतूक सुरळीत ठेवून पुणेकरांचा सुरक्षित प्रवास सुरक्षित कसा होईल, यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापराबाबत तज्ज्ञांशी समन्वय साधला आहे. त्यातून कोंडी हटविणाऱ्या पोलिसांना मदत होईल.
नक्की वाचा - Pune Traffic : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, 31 डिसेंबरला घराबाहेर पडताना जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
महापालिका, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शहराचा विस्तार वाढत आहे. शहरातील सर्व सिग्नलचे सुसूत्रीकरण करण्याची योजना मांडण्यात आली. याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
शहरात सध्या जागोजागी चौकात 1500 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणखी 2800 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. प्रमुख चौक, रस्ते, उपरस्ते भागातील कोंडी दूर करण्यासाठी, तसेच आरोपींना ओळखण्यासाठी त्याचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world