Dombivli News: कोट्यावधी रुपये खर्चून नागरिकांवर बेघर होण्याची वेळ, डोंबिवलीतील दोन हायप्रोफाईल इमारती धोक्यात

डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आणि एका खासगी कंपनीच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येत आहे. या कामादरम्यान मोठा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
High Risk Buildings In Dombivli

Dombivli High Risk Building :  डोंबिवली पूर्वेतील टिळक रोड परिसरात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC)आणि एका खासगी कंपनीच्या माध्यमातून कॅन्सर रुग्णालय उभारण्यात येत आहे. या कामादरम्यान मोठा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे जवळपास 50 कुटुंबांना त्यांची घरे सोडून बाहेरच्या ठिकाणी राहण्याची वेळ आहे. तर काहींना हॉटेलमध्ये राहावं लागत आहे.या प्रकरणाशी संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी रहिवासी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

रुग्णालयाच्या बांधकामासाठी जवळपास 40 फूट खोल खोदकाम करण्यात आले.मात्र,खोदकामादरम्यान आवश्यक सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.या बेजबाबदारपणामुळे खोदकामालगत असलेल्या दोन उच्चभ्रू निवासी इमारतींना गंभीर धोका निर्माण झाला.गुरुवारी एका इमारतीची संरक्षण भिंत कोसळली,तर शनिवारी दुपारी दुसऱ्या इमारतीची संरक्षण भिंतही कोसळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

Advertisement

नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीत खळबळ! 15 लाखांची खंडणी घेताना चार RTI कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं, प्रकरण काय?

"आज आमच्यावर बेघर होण्याची वेळ.."

घटनेची माहिती मिळताच केडीएमसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही इमारतींमधील रहिवाशांचे तातडीने स्थलांतर करण्यात आले. काही कुटुंबांची व्यवस्था जवळील इमारतीत करण्यात आली असून काहींना हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे.या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली."गेल्या सहा महिन्यांपासून हे काम सुरू आहे. 40 फूट खोदकाम सुरू असताना आम्ही वारंवार सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत सूचना दिल्या.परंतु, ना कंत्राटदाराने दखल घेतली,ना महापालिका अधिकाऱ्यांनी..आज आमच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. 

नक्की वाचा >> Vaibhav Sooryavanshi : पहिल्याच सामन्यात वैभवने ठोकले गगनचुंबी षटकार, सचिनसह या महिला क्रिकेटरचा रेकॉर्ड मोडला

यावर केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी म्हटलंय की, "धोक्यात आलेल्या दोन्ही इमारतींबाबत पुढील काय उपाययोजना करता येतील, यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. इमारतींची संरचनात्मक स्थिती तपासून त्यानुसार आवश्यक निर्णय घेतले जातील. तसेच, या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू करण्यात आली असून, चौकशीत जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल". असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.