जाहिरात

Vaibhav Sooryavanshi : पहिल्याच सामन्यात वैभवने ठोकले गगनचुंबी षटकार, सचिनसह या महिला क्रिकेटरचा रेकॉर्ड मोडला

आज शनिवारी 4 जुलै रोजी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आयोजित सामन्यात वैभवने मैदानावर उतरताच इतिहास रचला आहे.

Vaibhav Sooryavanshi : पहिल्याच सामन्यात वैभवने ठोकले गगनचुंबी षटकार, सचिनसह या महिला क्रिकेटरचा रेकॉर्ड मोडला
Vaibhav Sooryavanshi International Debut

Vaibhav Sooryavanshi International Cricket Debut : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली आहे. आज शनिवारी 4 जुलै रोजी मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये आयोजित सामन्यात वैभवने मैदानावर उतरताच इतिहास रचला आहे. डावखुरा फलंदाज वैभव आता भारतासाठी सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यु करणारा क्रिकेटर बनला आहे.तिलक वर्माने वैभवला डेब्यु कॅप दिली. वैभव भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा 122 वा खेळाडू आहे. दरम्यान, वैभवने इंग्लड विरोधात सुरु असलेल्या सामन्यात 10 चेंडूत 14 धावा केल्या. यामध्ये दोन गगनचुंबी षटकारांचा समावेश आहे. विल जॅक्सच्या गोलंदाजीवर वैभव बाद झाला.

सचिनचे वय 16 वर्ष आणि 205 दिवस होते

वैभव सूर्यवंशीने 15 वर्ष आणि 99 दिवस इतक्या वयात इंटरनॅशनल डेब्यु केला आहे. वैभवने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने 15 नोव्हेंबर 1989 ला पाकिस्तानच्या विरोधात कराचीत झालेल्या टेस्ट मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी सचिनचे वय 16 वर्ष आणि 205 दिवस होते.

नक्की वाचा >> Palghar Rain Video: विवा कॉलेजसह 'तो' परिसर पाण्याखाली, घराकडे जाण्यासाठी सोसायटीतील नागरिकांची तारेवरची कसरत

शेफाली वर्माचाही विक्रम मोडला

वैभव सूर्यवंशीने फक्त मेन्स क्रिकेटमध्येच नाही,तर भारतीय क्रिकेटच्या ओव्हरऑल रेकॉर्डमध्येही टॉपची जागा बनवली आहे.भारतासाठी महिला क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात डेब्यु करण्याचा विक्रम शेफाली वर्माच्या नावावर आहे.

नक्की वाचा >>Dombivli News: डोंबिवलीत खळबळ! 15 लाखांची खंडणी घेताना चार RTI कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं, प्रकरण काय?

शेफालीने 15 वर्ष आणि 239 दिवसांच्या वयात भारतीय महिला क्रिकेट संघासाठी डेब्यु केलं. शेफाने तिचा इंटरनॅशनल डेब्यु 24 सप्टेंबर 2019 ला दक्षिण आफ्रिके विरोधात टी-20 इंटरनॅशनल मॅच खेळून केला होता.आता वैभवने यापेक्षाही कमी वयात भारतासाठी खेळण्याचा नवा विक्रम केला आहे.
 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com