Pune Video Viral: पुण्यात चाललंय तरी काय? हिंदी बोलणाऱ्या व्यक्तीला रस्त्यावरच हाणलं, मराठी भाषेवरून वाद पेटला

पुण्यातही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक गुजराती भाषिक व्यक्ती मराठी ऐवजी हिंदी भाषेत बोलल्याने त्या व्यक्तीला नाहक त्रास दिला गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Marathi Language Issue In Pune Video Viral
पुणे:

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune Marathi Language Issue Viral Video :   गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषा न बोलणाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चांगलाच दणका दिला जात असल्याचं पाहायला मिळत आहे. ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून लोकांमध्ये वादविवाद निर्माण होतात. कारण अनेक ठिकाणी जे लोक राहतात, त्यामध्ये परप्रांतीय लोकांचाही समावेश असतो. त्यामुळे परप्रांतीय लोक प्रवासादरम्यान मराठी माणसांसोबत हिंदी भाषेचाही वापर करतात. 

पण काही लोक अशा लोकांवर निशाणा साधतात आणि त्यांना मराठी बोलण्यासाठी सांगतात. पुण्यातही अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक गुजराती भाषिक व्यक्ती मराठी ऐवजी हिंदी भाषेत बोलल्याने त्या व्यक्तीला नाहक त्रास दिला गेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पुण्यातील या व्हिडीओमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना पुण्यातील विमान नगर परिसरात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 

नक्की वाचा >> Railway Block News : 'या' तारखेला 103 वर्षांचा ब्रिटिशकालीन पूल पाडणार, कसं असेल मध्य रेल्वेचं नवं वेळापत्रक?

इथे पाहा पुण्यातील नागरिकाचा व्हायरल व्हिडीओ

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका व्हायरल व्हिडिओमुळे इंटरनेटवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या व्हिडिओमध्ये गुजराती भाषिक एका व्यक्तीला केवळ मराठीऐवजी हिंदी भाषा बोलल्यामुळे जाहीरपणे त्रास दिला गेल्याचे दिसत आहे. त्या व्यक्तीने आपली भाषा कुणावर लादलेली नव्हती किंवा स्थानिकांचा अपमानही केला नव्हता.

Advertisement

नक्की वाचा >> 18 महिन्यांतच कॅमेरा फेस केला! 100 जाहिराती, साऊथ इंड्रस्ट्रिही गाजवली, कोण आहे 'धुरंधर'ची सारा अर्जुन?

देशाची राष्ट्रीय भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा अपमान का?

तरीही काही  लोकांनी त्याला अडवून मराठीतच बोलण्याची जबरदस्ती करत माफी मागायला लावले. या घटनेमुळे भाषेच्या अभिमानाचे रूपांतर भाषेच्या सक्तीमध्ये तर होत नाही ना,असा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशाची एक राष्ट्रीय भाषा बोलणाऱ्या व्यक्तीचा सार्वजनिकरित्या अपमान का केला जावा? असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.