Pune News : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पुणे महापालिका आयुक्तांनी महापालिकेतील दोन बडे अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे. कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांचं निलंबन करण्यात आलं आहे. पुणे महापालिका आयुक्तांची ही मोठी कारवाई आहे.
पुण्यातील बाणेर परिसरात एका इमारतीला महापालिकेकडून पाच मजले बांधण्याची परवानगी होती मात्र संबंधित बांधकाम व्यावसायिकाने त्यावर आणखी दोन मजले वाढवण्यासाठी पालिकेतील टी डी आर विभागाकडे अर्ज केला. मात्र परवानगी मिळण्यापूर्वीच सहाव्या मजल्याचे काम पूर्ण झाले होते. तसेच सातव्या मजल्याचे काम सुरू होते. ही वस्तुस्थिती संबंधित विभागाच्या या दोन अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली नाही. बड्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्यात कमतरता आढळल्यामुळे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी ही कारवाई केली आहे.
नक्की वाचा - Pune Fire : पुण्यात भीषण आग, पहाटे 3 वा. सेंटर धडाधड पेटलं; 35-40 गाड्या जळून खाक
पुणे महापालिकेतील टीडीआर खर्ची विभागातील कनिष्ठ अभियंता आणि उपअभियंता यांचं निलंबन करण्यात आलं आहे. परवानगी नसताना देखील इमारतीच्या २ मजल्यांचा टी डी आर अनधिकृतपणे वाढवून दिल्याने आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. कनिष्ठ अभियंता शुभांगी तरुकमारे आणि उपअभियंता संदीप मिसाळ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे पालिकेने आदेश दिले आहेत. २ दिवसांपूर्वीच पुणे महापालिकेतील ३ जणांचे निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर पुणे महापालिकेतील दोन बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.