रायगडमध्ये मोठं हत्याकांड! मुलांनी वृद्ध माय बापाला संपवलं, बेडवर सापडला दोघांचा मृतदेह, 24 तासांतच गेम पलटला!

Raigad Shocking Murder Case : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे भयंकर घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. येथे एका वृद्ध दाम्पत्याचा सडलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह आढळला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Raigad Mhasla Murder Case

मेहबुब जमादार, प्रतिनिधी

Raigad Shocking Murder Case : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे भयंकर घटना घडल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. येथे एका वृद्ध दाम्पत्याचा सडलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह आढळला आहे.ही धक्कादायक घटना रविवारी घडली असून म्हसळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर म्हसळा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखे कडून या घटनेचा कसून तपास करण्यात आला. महादेव बाळ्या कांबळे (95),विठाबाई महादेव कांबळे (83), अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. हे वृद्ध दाम्पत्य म्हसळा तालुक्यातील मेंदडी कोंड येथे राहत होते. शनिवारी रात्री त्यांचा मृतदेह घरातील पलंगावर संशयास्पदरित्या आढळून आला. नरेश महादेव कांबळे (62) व चंद्रकांत महादेव कांबळे (60) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी 24 तासांतच आरोपींना ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, मुलं घरातील खर्चासाठी पैसै देत नसल्याने त्यांनी मुलांना घरात राहण्यासाठी बंदी घातली होती. याचा राग मनात धरून दोन मुलांनी वृद्ध आई-वडिलांचा खून केला. या हत्येच्या घटनेमुळं म्हसळा तालुक्यात सर्वांनाच धक्का बसला आहे.मेंदडी येथील या हत्याप्रकरणाचा 24 तासात छडा लावल्याने पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. 

नक्की वाचा >> CCTV : सर्वात भीषण अपघात! 12 माणसं आणि 17 वाहनांना डंपरने उडवलं..व्हिडीओ पाहून पायाखालची जमिनच सरकेल

म्हसळा पोलीस ठाण्याचे नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे, उप पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर येडवले, रोहिणकर, पोलीस शिपाई सागर चितारे,राजेंद्र म्हात्रे,ठाणे अमलदार पळोदे व म्हसळा पोलीस ठाण्यातील कर्मचारी,स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव,पोलीस उप निरीक्षक अविनाश पाटील,सहाय्यक फौजदार संदीप पाटील,प्रसाद पाटील,हवालदार सुधीर मोरे, ईश्वर लांबोटे,शाम कराडे,सचिन वावेकर,ओंकार सोनकर फॉरेन्सिक टीम,डॉग स्कोड,फिंगर प्रिंट एक्सपर्ट टीमने या हत्याप्रकरणाचा तपास वेगाने केला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या. 

नक्की वाचा >> लाखोंचे दागिने घालून परफ्यूम मारता..एका चुकीमुळे होईल मोठं नुकसान! प्रियांका चोप्रासोबत काय घडलं? बघा जरा