जाहिरात

CCTV : सर्वात भीषण अपघात! 12 माणसं आणि 17 गाड्यांना डंपरने उडवलं..व्हिडीओ पाहून पायाखालची जमिनच सरकेल

Shocking Accident Video Viral : सर्वात खतरनाक अपघाताच्या घटनेच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या अपघातात 12 लोकांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.

CCTV : सर्वात भीषण अपघात! 12 माणसं आणि 17 गाड्यांना डंपरने उडवलं..व्हिडीओ पाहून पायाखालची जमिनच सरकेल
Truck Accident Viral Video
मुंबई:

Shocking Accident Video Viral : सर्वात खतरनाक अपघाताच्या घटनेच्या व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा भीषण अपघात राजस्थानच्या जयपूरमध्ये घडला असून यामध्ये कमीत कमी 12 लोकांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. जयपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार,हा अपघात तेव्हा घडला, जेव्हा एका अनियंत्रीत डंपरने 19 वाहनांना धडक दिली. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाहीत.डंपरची धडक इतकी जोरदार होती की, अनेक कार आणि बाईक्सचा चक्काचूर झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक वर्दळीच्या रस्त्यावरून जात असतात. याचदरम्यान एक डंपर वेगाने येतो आणि बघता बघता या लोकांना चिरडून टाकतो.या अपघाताची घटना इतक्या वेगाने होते की,अपघात कसा घडला, हे कोणालाच लगेच लक्षात येत नाही.

दुपारी जवळपास 1 वाजता झाला अपघात 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अपघाताची घटना दुपारी जवळपास 1 वाजता वीकेई( विश्वकर्मा औद्योगिक विभाग) लोहा मंडी येथे घडली. हायवेर 14 वर लोहा मंडी पेट्रोलपंपाच्या दिशेन हा डंपर भरधाव वेगाने जात होता. पण ड्रंपरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरून ताबा सुटला आणि डंपर अनेक वाहनांना धडकला.यामध्ये कार आणि बाईक्सचा समावेश आहे.

नक्की वाचा >> लाखोंचे दागिने घालून परफ्यूम मारता..एका चुकीमुळे होईल मोठं नुकसान! प्रियांका चोप्रासोबत काय घडलं? बघा जरा

भयानक अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल

हा अपघात घडल्यानंतर स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यानंतर त्यांनी अपघातात जखमी झालेल्या लोकांना बाहेर काढलं आणि एसएमएस रुग्णालयात तातडीनं दाखल केलं. हा अपघात इतका भीषण होता की,रस्त्यावर अनेक कार्स आणि वाहनांचं मोठं नुकसान झालं.या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण झाली होती.पोलिसांनी इतर वाहनांना पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना दिल्या होत्या.तर अपघातात मृत्यू झालेल्या लोकांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी अपघाताच्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं. तसच जखमींवर लवकरात लवकर उपचार करण्याचे आदेशही संबंधीत विभागाला दिले.

नक्की वाचा >> Video : "फॉरेनची पाटलीण..", ट्रॅफिकमध्ये ऑस्ट्रेलियन महिलेसोबत कॅब ड्रायव्हरने असं काही केलं..सर्वच थक्क झाले!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com