बाईक चोरली पण एक चूक महागात पडली, कल्याण APMC मार्केटमध्ये दोघांना अटक

Advertisement
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

बाईक चोरी केली आणि त्यानंतर त्याच बाईकमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये चोरी केलेली बाईक पाहायला गेलेल्या चोरांना पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. वाहिद खान आणि राहुल परिहार अशी या चोरट्यांची नावे आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वाहिद आणि परिहार चोरी केलेली बाईक पाहण्यासाठी ज्या बाईकवर गेले त्याला नंबर प्लेट नव्हती. बाजारपेठ पोलिसांना माहिती मिळताच दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यानतंर चौकशीदरम्यान चोरीची माहिती समोर आली. दोघांनी मिळून आत्तापर्यत तीन दुचाकी आणि दोन रिक्षा चोरी केल्या आहेत. त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकी आणि रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. 

(नक्की वाचा-  Nashik News: पत्नीच्या जाचाला कंटाळून इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं, 6 जणांविरोधात गुन्हा दाखल)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये नेहमीच गर्दी असते. फळ आणि भाजीपाल्याच्या गाड्या लागलेल्या असतात. ग्राहक खरेदी करण्यात दंग असतात. याच गर्दीचा फायदा घेत एका दुचाकीवर दोन तरुण फिरत असल्याचे काही लोकांना दिसले. या दुचाकीला नंबर प्लेट देखील नव्हती. नंबर प्लेट नसलेली दुचाकी फिरत असल्याने त्याठिकाणच्या लोकांना संशय आला. याची माहिती त्यांनी बाजारपेठ पोलिसांना दिली. 

(नक्की वाचा- Shocking! पतीचा मृतदेह स्वयंपाकघरात लटकलेल्या अवस्थेत; खाली पत्नी पुजा-अर्चा करण्यात लीन)

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गौड यांनी या तरुणांची चौकशी करण्याकरता पोलिस  अधिकारी अजिंक्य मोरे आणि काही पोलिसांना पाठवले. पोलिसांनी या दोन तरुणाना ताब्यात घेऊन चौकशी केली. हे दोघे तरुण जी दुचाकी घेऊन आले होते ती चोरीची होती. पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्याचं बिंग फुटलं. 

दोघांनीही एपीएमसी मार्केटमध्ये काय फिरत होते याची कबुली दिली. आम्ही एक दुचाकी चोरी केली होती. ती दुचाकी या मार्केट परिसरात उभी करुन ठेवली होती. त्याच ठिकाणी ती दुचाकी आहे की नाही हे पाहण्यासाठी आलो होतो. या दोघांना पोलिसांनी अटक करुन पुढील तपास सुरु केला आहे. 

Topics mentioned in this article