Mumbai-Pune Highway: मुंबई-पुणे हायवेवर कशी होतेय फसवणूक? हा Insta Video बघाच; कमेंट्सही नक्की वाचा

Mumbai-Pune Highway News: मोटारसायकलवरून येऊन गाडीच्या टायरमधील हवा कमी झाल्याचे सांगून, जवळच्या पंक्चरच्या दुकानात घेऊन जाण्याचा हा प्रकार असून, यामुळे प्रवाशांना अधिकचा आर्थिक फटका बसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai-Pune Highway News: मुंबई-पुणे जुन्या हायवेवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पळस्पे फाटा ते चौकदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी टायर पंक्चर करून प्रवाशांना लुबाडण्याचे रॅकेट सुरू केले आहे. मोटारसायकलवरून येऊन गाडीच्या टायरमधील हवा कमी झाल्याचे सांगून, जवळच्या पंक्चरच्या दुकानात घेऊन जाण्याचा हा प्रकार असून, यामुळे प्रवाशांना अधिकचा आर्थिक फटका बसत आहे.

नेमकं काय घडतं?

हा प्रकार कसा घडतो, याचा अनुभव एका प्रवाशाने शेअर केला आहे. त्याने सांगितलं की, जेव्हा तुम्ही कमी वेगाने गाडी चालवत असता, तेव्हा मागून येणारा बाईकस्वार तुम्हाला गाडीच्या टायरमधील हवा कमी झाल्याचे सांगतो. जर तुम्ही त्याला टाळले, तर लगेच दुसरा व्यक्ती येऊन तोच मुद्दा पुन्हा सांगतो. यामुळे तुम्ही घाबरून जवळच्या पंक्चरच्या दुकानात जाता.

(नक्की वाचा-  VIDEO: नशीब काय असतं, एकदा बघा! भिंत कोसळली अन् महिला थोडक्यात बचावली)

तिथे हवेचे प्रेशर कमी दाखवून हातचलाखीने तुमच्या टायरमध्ये 10 ते 15 पंक्चर काढले जातात. प्रत्येक पंक्चरसाठी जास्त पैसे आकारून कमीतकमी 1000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळली जाते. हा प्रकार आता एक नियमित घटना बनली आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

याचा एक व्हिडीओ @alert_by_ride या इन्स्टाग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आला असून तो व्हायरल होत आहे. यामुळे अनेक प्रवाशांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. प्रवाशांनी मुंबई-पुणे जुन्या हायवेवर प्रवास करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीने टायरमधील हवेबद्दल सांगितल्यास घाबरून त्वरित पंक्चर काढायला जाऊ नये, असे आवाहन करण्यात येत आहे. कमेट्समध्ये अनेक यूजर्सने देखील वेगवेगळ्या ठिकाणचे आपले अनुभव शेअर केले.

Advertisement

Topics mentioned in this article