Uber Driver Viral Video : सोशल मीडियावर उबर कॅबचं एक प्रकरण वेगाने व्हायरल होत आहे. एका महिलेनं आरोप केला आहे की, मुंबईत उबर राईड दरम्यान एक कॅब चालकाने तिच्यासोबत गैरवर्तन केलं.एवढच नव्हे, ड्रायव्हरने महिलेला मारहाणही केली. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर कंपनीने याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवानी नावाच्या एका महिलेनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने म्हटलंय की, काही दिवसांपूर्वी तिने महालक्ष्मी (मुंबई) ते नेरुळ(नवी मुंबई) साठी उबर कॅब बुक केली.राईड पूर्ण झाल्यानंतर अॅपवर 501 रुपये भाडे दाखवत होतं. मी ऑनलाईन पेमेंट केलं आणि राईड एंड झाली.त्यानंतर ड्रायव्हरने 40 रुपये एक्स्ट्रा देण्याची मागणी केली. ही रक्कम अॅपमध्ये दाखवण्यात आली नव्हती आणि राईडही एंड झाली होती. त्यामुळे मी पैसै देण्यास नकार दिला.
महिलेचं म्हणणं आहे की,पैसे न दिल्याने चालक भडकला.त्याने गाडी आतून लॉक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने धमकावण्याचा प्रयत्न केला.महिला कशीबशी गाडीतून बाहेर निघाली आणि पण तरीही त्याने रस्ता आडवण्याचा प्रयत्न केला.महिलेचा आरोप आहे की,जेव्हा तिने विरोध केला,तेव्हा चालक तिच्या खूप जवळ आला. त्यानंतर तिने चालकाला मागे ढकललं. त्यानंतर चालकाने महिलेला थप्पड मारली आणि तिच्यासोबत गैरवर्तन केलं. त्यानंतर जवळपास असलेल्या लोकांनी महिलेला मदत करण्याचा प्रयत्न केला. तसच त्या महिलेनं तिच्या ऑफिसमधील लोकांनाही मदतीसाठी बोलावलं.
नक्की वाचा >> Tuljapur News: तुळजापुरात भक्तीच्या दारातच VIP भिंत; सर्वसामान्यांचा प्रवेश रोखल्याने संतापाचा उद्रेक
काय आहे संपूर्ण प्रकरण?
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उबरने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने म्हटलंय की,प्रवाशांची सुरक्षा त्यांची सर्वात पहिली प्रायोरिटी आहे. महिलेसोबत झालेल्या प्रसंगाबाबत उबरने दु:ख व्यक्त केलं आहे. कंपनीच्या नियमांनुसार चालकाविरोधात कारवाई केल्याचंही कंपनीने म्हटलं आहे. तसच महिलेचं अकाऊंट पुन्हा सुरु केलं आहे. गरज पडल्यास भविष्यातही तिला मदत केली जाईल,असंही म्हटलंय.
सोशल मीडियावर लोक भडकले
हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक लोकांनी उबर कंपनीच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत.लोकांचं म्हणणं आहे की,जर महिलेसोबत असं काही घडलं होतं,तर तिचं अकाऊंट ब्लॉक का केलं गेलं?लोकांनी हे गंभीर प्रकरण असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसच महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे.