'राम भाजपमुक्त झाला' नरेटिव्हवरून ठाकरेंची जोरदार फटकेबाजी

आता खऱ्या अर्थाने राम भाजपमुक्त झाला असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

रामाचा आधार घेत भाजपने प्रचार करत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र जिथे-जिथे राम आहे तिथे - तिथे भाजपने सपाटून मार खालला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने राम भाजपमुक्त झाला असे वक्तव्य करत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवाय भाजपच्या नरेटिव्हच्या टिकेला उत्तर देत अच्छे दिनच्या नरेटिव्हचे काय झाले असा प्रश्न उपस्थित करत भाजपलाच कोंडीत पकडले आहे. महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच उद्धव ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी करत भाजपवर चांगलेच तोंडसुख घेतले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर 

लोकसभेची निवडणूक मविआ लोकांमध्ये नरेटिव्ह सेट केल्यामुळे जिंकली असा आरोप भाजपकडून होत आहे. संविधान बदलणार हा नरेटिव्ह सेट केला गेला. त्यामुळे भाजपला फटका बसला. मात्र या आरोपाला उद्धव ठाकरे यांनी तितक्याच ताकदीने  उत्तर दिले आहे. जर आम्ही नरेटिव्ह सेट केला असा त्यांचा आरोप आहे तर मग अच्छे दिनच्या नरेटिव्हचे काय झाले? मोदी गॅरंटीचे काय झाले? पंधरा लाख देणार, मंगळसूत्र काढून घेणार या हे नरेटिव्ह नव्हते का असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करत भाजपचीच कोंडी केली आहे. भाजप विरोधात कोण लढू शकत नाही. हा भाजपचा भ्रमाचा भोपळा जनतेने फोडला असेही ठाकरे म्हणाले. हा विजय अंतिम नाही आता खरी लढाई सुरू झाली आहे. केंद्रात मोदी नाही तर एनडीएचे सरकार आले आहे. पण हे किती दिवस टिकेल कल्पना नाही असेही वक्तव्य त्यांनी केले. ठाकरे हिरव्या मतांवर विजयी झाले. एम फॅक्टरनी त्यांना तारले या टिकेलाही त्यांनी जोरदार उत्तर दिले. एम फॅक्टर म्हणजेच मराठी फॅक्टर. आम्हाला सर्व धर्मियांनी मतदान केले. मुंबई लुटली जात असेल तर मराठी माणूस मुंबई लुटणाऱ्यांना झोपतही मतदान करणार नाही असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. दरम्यान जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही असेही ते म्हणाले. 

Advertisement

ट्रेडिंग बातमी -  रक्षा खडसे केंद्रात मंत्री झाल्या, पहिल्यांदाच जळगावात आल्या, सर्वात आधी काय केलं?

शरद पवारांनी पुन्हा मोदींना डिव चलं 
   
लोकसभा निवडणुकीत मोदींनी ज्या ठिकाणी सभा आणि रोड शो केले त्या ठिकाणी मविआचे उमेदवार जिंकले. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की मोदींचे आभार मानले पाहीजेत असं वक्तव्य करत शरद पवारांनी मोदींना डिवचले. दोन तीन महिन्यात विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुकांतही मोदींनी जास्ती जास्त सभा घ्याव्यात असे पवार यावेळी म्हणाले. जे पक्ष सोडून गेले आहेत त्यांना पुन्हा पक्षात घेण्याचा प्रश्न नाही असेही ते म्हणाले. शिवाय शेतकरी, सर्व सामान्य हा भाजपच्या विरोधात होता. त्यात आणखी काही बदल होईल असे वाटत नाही. त्यामुळे विधानसभेतही महाविकास आघाडीचा विजय होईल असे पवार यावेळी म्हणाले. 

Advertisement

ट्रेडिंग बातमी -  पुढचा मुख्यमंत्री कोण? आदित्य ठाकरेंनी जाहीर पणे सांगितलं

'मविआमध्ये कोणी मोठा छोटा भाऊ नाही'   

महाविकास आघाडीत मोठा भाऊ छोटा भाऊ असे काही नाही. ज्याच्याकडे चांगला उमेदवार असेल तो त्या मतदार संघातून निवडणूक लढेल. विधानसभेसाठी हे आमचे सुत्र ठरले असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.  आमच्यात चांगला समन्वय आहे. असेही त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक ज्या ताकदीने लढलो त्या पेक्षा अधिक ताकदीने विधानसभा लढू असेही चव्हाण म्हणाले. आम्हाला खात्री आहे विधानसभेलाही जनता आम्हालाच आशिर्वाद देईल. राज्यात सत्ता परिवर्तन निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Advertisement

ट्रेडिंग बातमी -  'मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवावी पण दाढीवाल्यांना मदत करु नये', मनसेचा टोला

विधानसभेची तयारी सुरू 

महाविकास आघाडीने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीने प्राथमिक बैठकही झाली आहे. लोकसभेला असलेल्या सर्व घटकपक्षांना सोबत घेवून ही निवडणूक लढणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. वंचित ला बरोबर घेणार का याबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जे आमच्या बरोबर येवू इच्छितात त्यांनी यावे. कोणत्याही अटी ठेवू नये असेही ते म्हणाले. दरम्यान मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण या प्रश्नाला उत्तर देताना महायुतीचा चेहरा कोण असा प्रती प्रश्न त्यांनी केला. महायुतीत आता तिघेही ओसाड आहेत असेही ते म्हणाले.