Ambarnath Madrasa News : अंबरनाथमध्ये पालिका शाळेच्या आवारात अनधिकृत मदरसा, मनसेचा नगरपालिकेला इशारा

Ambarnath News : मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी स्वतः अंबरनाथ नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी, मुख्याधिकारी आणि प्रशासक यांची भेट घेत या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, अंबरनाथ

अंबरनाथमध्ये नगरपालिका शाळेच्या आवारात अनधिकृतपणे एक मदरसा बांधण्यात आला आहे. या मदरशावर अंबरनाथ नगरपालिकेने 7 दिवसात कारवाई करावी, अन्यथा आम्ही हा मदरसा पाडून टाकू, असा इशारा मनसेने दिला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच पालिकेची लोकल बोर्ड शाळा आहे. या शाळेची नवीन इमारत बांधण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. या नव्या इमारतीच्या बाजूलाच पालिकेच्या जागेत अनधिकृतपणे एक मदरसा उभारण्यात आला आहे. या मदरशाच्या आत 'अल एहसान एज्युकेशनल अँड सोशल सोसायटी'चा फलक असून त्यावर 'मदरसा हसन बिन साबित' असं नाव लिहिलेलं आहे. या अनधिकृत मदरशाला महावितरणकडून वीज मीटर सुद्धा देण्यात आला आहे. 

(नक्की वाचा- IAS Officer Transfer: पुन्हा बदल्यांचा धडाका! 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; वैदेही रानडेंकडे मोठी जबाबदारी)

या मदरशावर कारवाई करण्याबाबत मनसे विभाग अध्यक्ष विशाल गायकवाड यांनी 31 जानेवारी रोजी पालिकेला पत्र दिलं होतं. यानंतर मनसे शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेवक स्वप्नील बागुल यांनी स्वतः अंबरनाथ नगर पालिकेचे उपमुख्याधिकारी, मुख्याधिकारी आणि प्रशासक यांची भेट घेत या अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी केली होती. 

( नक्की वाचा :  Trump-Zelensky Clash : डोनाल्ड ट्रम्प झेलेन्सकींवर का भडकले? व्हाईट हाऊसमधील चर्चेत नेमकं काय घडलं? )

मात्र तरी देखील या मदरशावर कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेने संताप व्यक्त केला आहे. तसेच येत्या ७ दिवसात जर पालिकेने या मदरशावर कारवाई केली नाही, तर मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे स्वतः हा मदरसा पाडून टाकेल, असा इशारा माजी नगरसेवक स्वप्निल बागुल यांनी अंबरनाथ नगरपालिकेला दिला आहे. त्यामुळे आता पालिकेच्या कारवाईकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

Advertisement

Topics mentioned in this article