जाहिरात

IAS Officer Transfer: पुन्हा बदल्यांचा धडाका! 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; वैदेही रानडेंकडे मोठी जबाबदारी

राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले असून 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

IAS Officer Transfer: पुन्हा बदल्यांचा धडाका! 8 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  वैदेही रानडेंकडे मोठी जबाबदारी

मुंबई: राज्यामध्ये महायुतीचे सरकार आल्यापासून पोलीस प्रशासनामध्ये मोठे बदल केले जात आहेत. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण, अत्याचाराच्या वाढत्या घटना तसेच आता पुण्याच्या स्वारगेट स्थानकातील बलात्काराच्या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशातच आता राज्याच्या पोलीस यंत्रणेत मोठे बदल करण्यात आले असून 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या?

1. राधाविनोद शर्मा (IAS:RR:2012) महानगर सहआयुक्त, MMRDA, मुंबई यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
2. एम.जे. प्रदीप चंद्रेन (IAS:RR:2012) अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
3. बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

4. वैदेही रानडे (IAS:SCS:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
5. डॉ. अर्जुन चिखले (IAS:SCS:2015) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
6. डॉ. पंकज आशिया (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
7. जगदीश मिनियार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

8. गोपीचंद कदम (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, सोलापूर यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी 13 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक (एसपी), उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये मनोज कुमाक शर्मासह यशस्वी यादव, आर. बी डहाळे यांचा समावेश होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: