पुण्याला केंद्र सरकारची मोठी भेट; नाशिक फाटा-खेड 7,827 कोटींच्या एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Pune News : एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून निघणाऱ्या/जाणाऱ्या वाहतुकीसाठी हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी तयार करेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, नवी दिल्ली

केंद्र सरकारने पुण्यासाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने नाशिक फाटा ते खेडसाठी 30 किमी लांबीच्या 8-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. या कॉरिडॉकसाठी केंद्र सरकारकडून 7827 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. कॉरिडॉर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण यांसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडला जाईल.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

एलिव्हेटेड कॉरिडॉर पुणे आणि नाशिक दरम्यानच्या NH-60 वरील चाकण, भोसरी इत्यादी औद्योगिक केंद्रांवरून निघणाऱ्या/जाणाऱ्या वाहतुकीसाठी हाय-स्पीड कनेक्टिव्हिटी तयार करेल. या कॉरिडॉरमुळे चिंचवडच्या आसपासची वाहतूक कोंडीची समस्या कमी होणार आहे. पिंपरी-नाशिक फाटा ते खेड या दोन्ही बाजूंच्या 2 लेन सर्व्हिस रोडसह सध्याच्या रस्त्याचे 4/6 लेनमध्ये अपग्रेड केले जातील. याशिवाय 8 लेनचा उड्डाणपूल तयार केला जाईल. 

(नक्की वाचा - Paris Olympic 2024: कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला रेल्वेकडून पदोन्नतीचं गिफ्ट; दुपटीने वाढला पगार)

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. नितीन गडकरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 7,827 कोटी रुपये किंमतीच्या व 30 किमी लांबीच्या, 8-लेन एलिव्हेटेड नाशिक फाटा-खेड कॉरिडॉरला मंजुरी दिली आहे. हा कॉरिडॉर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि चाकण यांसारख्या प्रमुख आर्थिक केंद्रांना जोडेल, ज्यामुळे या भागाची लॉजिस्टिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.

Advertisement

(नक्की वाचा -  माझी लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले ही योजना...)

या प्रकल्पामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच चाकण परिसराच्या विकासातील एक मोठा अडथळा दूर होईल. यामुळे या भागातील ऑटोमोबाईल क्षेत्र तसेच इतर उद्योगांसाठी लॉजिस्टिक्स क्षमता वाढेल, वाहतूक खर्च कमी होईल तसेच ट्रॅफिक जाम आणि प्रदूषणाची समस्या दूर करण्यास मदत होईल. हा कॉरिडॉर मेगा फूड पार्क, टेक्सटाईल क्लस्टर्स, SEZ, फार्मा आणि मेडिकल क्लस्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्रासह 10 आर्थिक नोड्सना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल, ज्यामध्ये नऊ जंक्शन्स आणि सुलभ वाहतूकीसाठी दोन मोठे पूल समाविष्ट आहेत, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं. 

Topics mentioned in this article