लॅपटॉपच्या मोहापायी UPSC विद्यार्थिनीचं चुकीचं पाऊल, पोलीस कारवाईची शक्यता

यूपीएससीच्या तयारीसाठी पैसे नव्हते. त्यासाठी तिने मित्राकडून लॅपटॉप मागितला. तो लॅपटॉप पैशाकरिता तिने विकला.

Advertisement
Read Time: 2 mins

अमजद खान, कल्याण

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची (UPSC) तयारी करणाऱ्या तरुणीचं लॅपटॉपच्या मोहापाई अधिकारी होण्याचं स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. मित्राकडून घेतलेले लॅपटॉप तरुणीने विकला आणि लुटीचा खोटा बनाव रचला. याप्रकरणी पोलीस तरुणीविरोधात कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. अंजली पांडे असं या तरुणीचं नाव आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यूपीएससीच्या तयारीसाठी पैसे नव्हते. त्यासाठी तिने मित्राकडून लॅपटॉप मागितला. तो लॅपटॉप पैशाकरिता तिने विकला. बरेच दिवस झाल्याने मित्र लॅपटॉप परत मागत होता. त्यावेळी तरुणीने स्वत:च्या अंगावर कास्टिंग सोडा टाकून लूटीचा बनाव केला. मात्र पोलिसांनी तिचा बनाव उघडा पाडला आहे. या तरुणीविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी पोलिसांनी कोर्टाकडून परवानगी मागितली आहे. 

(कार अपघातानंतर ड्रायव्हरला घरात कोंडलं, अग्रवाल कुटुंबाच्या डोक्यात नेमकं काय सुरू होतं? पोलिसांनी सांगितलं...)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मे रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कल्याण पूर्वेतील जे प्रभाग कार्यालयासमोर असलेल्या पार्किंगमध्ये एका तरुणीवर केमिकल टाकून तिच्याकडून लॅपटॉप घेऊन चोरटे पसार झाले होते, अशी तक्रार पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी लुटीचा गुन्हा दाखल करुन पूढील तपास सुरु केला. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, वरीष्ठ पोलीस निरिक्षक अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस पथके या प्रकरणाचा तपास करत होते. 

न्यायाधीशांच्या घरी चोरट्यांनी मारला डल्ला, परदेशी चलनाबरोबरच दागिने लांबवले

प्रकरणाचा सखोल तपास सुरु झाला, तेव्हा तक्रारदार तरुणी अंजली पांडे हिने पोलिसांना जी माहिती दिली, त्यावर पोलिसांना संशय आला. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती माहिती अतिशय धक्कादायक होती. अंजली पांडे नावाची तरुणी अंधेरी येथे राहते. ती यूपीएससी परीक्षेची तयारी करत आहे. तिचा मित्र कल्याणमध्ये राहतो. यूपीएसची तयारी करण्यासाठी तिने तिच्या मित्राकडून लॅपटॉप घेतला होता. मात्र तिला पैशाची चणचण होती.  त्यावेळी तिने मित्राकडून घेतलेला लॅपटॉप विकून टाकला. 

Advertisement

मात्र मित्र त्यानंतर वारंवार लॅपटॉप परत मागत होता. विकलेला लॅपटॉप कसा परत द्यायचा तसेच त्याला द्यायला पैसेही नव्हते. त्यावेळ अंजलीने एक कट रचला. कल्याणला येऊन तिने एका दुकानातून कास्टिंग सोडा घेतला. ज्या दुकानातून सोडा खरेदी केला त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील हाती लागले आहे. पोलिसांसमोर अंजलीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात पोलीस खोटी माहिती देऊन पोलिसांनी दिशाभूल केल्याप्रकरणी तरुणीविरोधात ठोस कारवाई करणार आहेत.

Topics mentioned in this article