स्तन कापले, गुप्तांगावर वार; हत्येपूर्वी यशश्रीवर बलात्कार झाला? पोस्टमार्टम अहवालात मोठा खुलासा

दगडाने तिचा चेहरा ठेचण्यात आला होता. तिची ओळख पटवणंही कठीण झालं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
उरण:

उरणमधील यशश्री शिंदे (Yashshree Shinde death) या 20 वर्षांच्या तरुणीची अत्यंत निघृणपणे हत्या करण्यात आली. तिच्या चेहऱ्याची भयंकर अवस्था झाली होती. तिचे स्तन कापण्यात आले होते, याशिवाय तिच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक खुणा आढळून आल्या होत्या. प्रायव्हेट पार्टवरील खुणांवरून तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. मात्र यशश्री शिंदेचा प्राथमिक पोस्टमार्टम अहवाल समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशश्री शिंदे यांच्या प्राथमिक पोस्टमार्टम अहवालात बलात्काराची पुष्टी झालेली नाही. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात यशश्री शिंदे यांच्यावर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झालं आहे. यशश्री शिंदे यांचा चाकुने खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. आरोपींनी यशश्री शिंदे यांच्या पोटावर व पाठीवर चाकूने वार केले होते, ही बाबदेखील स्पष्ट झाली आहे. 

यशश्री शिंदे हिची हत्या करण्यापूर्वी आरोपीने तिच्यावर अत्याचार केले. दगडाने तिचा चेहरा ठेचण्यात आला होता. तिची ओळख पटवणंही कठीण झालं होतं. याशिवाय आरोपीने तिच्या गुप्तांगावरही वार केले होते. छातीवर वार करण्यात आले होते. काही वृत्तसंस्थांनुसार, तिचे स्तनही कापण्यात आले होते. इतक्या निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणात आरोपी दाऊद शेख याचा तपास सुरू आहे. यशश्रीच्या आई-वडिलांनी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - हाडं तोडली, प्रायव्हेट पार्टवर जखमा, चेहऱ्याचा चेंदामेंदा; उरणमधील यशश्रीविरोधात इतकी क्रूरता का आली?

कॉल रेकॉर्डमधून धक्कादायक बाबी उघड
तपास करणाऱ्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी जेव्हा यशश्री बेपत्ता झाली, त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले होते. कॉल रेकॉर्डमधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. सीडीआरमधून मिळालेल्या एका नंबरवर यशश्री बराच काळ बोलत असल्याचं दिसून आलं. या नंबरवरून यशश्रीला कॉल येत आणि जातही होते. नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता. काही वर्षांपूर्वी  याच्याविरोधात यशश्री आणि तिच्या कुटुंबीयांनी पॉक्सो केसअंतर्गत एफआयआर दाखल केली होती. अशात बेपत्ता झालेल्या यशश्रीच्या तपासात पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला. तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन बंद आहे. 

Advertisement