Pune News : हगवणे पिता-पुत्राची पक्षातून हकालपट्टी, अजित पवारांच्या पोलीस आयुक्तांना कडक कारवाईच्या सूचना

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अजित पवार यांनी  पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड

Vaishnavi Hagavane:  वैष्णवी हगवणेचा (सून) छळ करुन हत्या केल्याचा आरोप असलेल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे या दोघांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सक्रिय पदाधिकारी असले तरी त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी नव्हती, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अजित पवार यांनी  पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना केल्याची माहिती मिळत आहे.

(नक्की वाचा-  Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)

सूरज चव्हाण याबाबत सांगितलं की, "राजेंद्र हगवणे यांच्या घरात जी घटना घडली आहे, ती मानवतेला काळीमा फासणारी आहे. या घटनेचे राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम निषेध करतो. वैष्णवी हगवणेला न्याय मिळाला पाहिजे. तिला ज्यांनी -ज्यांनी त्रास दिला त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे." 

(नक्की वाचा-  Pune News: 'हे बाळ माझं नाही तर दुसऱ्याचे', वैष्णवी बरोबर त्या घरात भयंकर घडलं, FIR मध्ये धक्कादायक बाबी)

"माझा पदाधिकारी, कार्यकर्ता चुकीचा वागत असेल तर त्याला टायरमध्ये घेऊन मारलं पाहिजे, अशी भूमिका अजित पवारांनी वारंवार स्पष्ट केली आहे.  राष्ट्रवादी पक्ष अशा कुठल्याही घटनेला पाठिशी घालण्याचं काम करत आहे. कालच अजित पवारांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन करुन आरोपींना तत्काळ अटक करुन कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत", असंही सूरज चव्हाण यांनी सांगितलं. 

हगवणे पिता-पुत्राचा शोध सुरु

वैष्णवी हगवणेच्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप असणारे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा अजूनही फरार असून दोघांनाही शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेल्याची माहिती मिळत आहे. तसेच मयत वैष्णवीचं 10 महिन्याचं बाळ ज्या निलेश चव्हाण नामक व्यक्तीकडे होतं त्याने ते बाळ  हगवणे कुटुंबीयांकडे सुपूर्द केल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

Topics mentioned in this article