Vaishnavi Hagavane : हगवणेंच्या वकिलाचा जुना कारनामा उघड; 3 वर्षापूर्वी गुन्हा दाखल

Hagavane Lawyer Vipul Dushing : वकील विपुल दुशींग यांच्यावर सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड

Vaishnavi Hagavane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. हगवणे कुटुंबातील आरोपींची बाजू न्यायालयात वकील विपुल दुशिंग यांच्याकडून मांडली जात आहे. विपुल दुशिंग यांनी हगवणे कुटुंबियांच्या वतीने युक्तीवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवत आपल्या आशिलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र विपुल दुशिंग यांच्यावर देखील मारहाणीच्या प्रकरणाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वकील विपुल दुशींग यांच्यावर सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी 353/34  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकील विपुल दुशिंग हे 2022 मध्ये एका आरोपीचे वकील म्हणून त्यावेळी काम पाहत होते. 

Advertisement

(नक्की वाचा-  Crime News: हगवणे कुटुंबीयांची पोलखोल करणारा VIDEO व्हायरल; पाहा जावयाचे काय-काय हट्ट पुरवले?)

न्यायाधीशांसमोर सुनावणीची पुढची तारीख कोणती ठेवायची यावरुन त्यांचे सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला‌ होता. त्यामुळे चिडून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील विपुल दुशिंग यांनी सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.

Advertisement

(नक्की वाचा- - ऑपरेशन लग्नकार्य! हुंडा घेणारा कळवा 5000 मिळवा, 'या' राजकीय पक्षाचा भन्नाट उपक्रम)

वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर ही वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटकपूर्व जामीन दिल्याने दुशिंग यांची अटक टळली होती. 

Advertisement

वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय

आरोपी हगवणे कुटुंबीयांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तीवाद करताना मृत वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते‌. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे, असा दावा हगवणे कुटुंबीयांनी केला आहे. वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे एका व्यक्तीसोबत चॅट पकडले होते. त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केला. एकदा उंदराचे औषध घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न तिने केला होता, असा दावा हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाने केला.