
सूरज कसबे, पिंपरी-चिंचवड
Pune News : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याचा प्रकार वकीलांमार्फत केला जात आहे. हगवणे कुटुंबीयांकडे 5 कोटींची फक्त वाहने आहेत. त्यामुळे आम्ही फॉर्च्युनर मागणी का करु? असं म्हणणाऱ्या हगवणेंची पोलखोल करणारा व्हिडीओ आता समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैष्णवी हगवणे हिला गणेश उत्सवाच्या काळात कस्पटे कुटुंबीयांनी चांदीच्या गौरी दिल्या होत्या. या गौरी देत असल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. त्याच बरोबर अधिकमासाला जावई शशांक आणि हगवणे कुटुंबीयांचा हावरटपणा देखील या व्हिडीओत दिसत आहे. यात शशांकने केवळ स्वतःचा नव्हे तर भाऊ सुशीलचा ही हट्ट पुरवून घेतला होता. आदीकमासात जावई आणि भाऊ सुशीलला कस्पटे कुटुंबीयांनी अनेक महागड्या वस्तू दिल्या.
(नक्की वाचा- 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं)
कस्पटे कुटुबीयांनी काय-काय दिलं?
- चांदीचे ताट
- शशांकला अंगठी
- शशांक आणि सुशीलला चांदीचे निरंजन
- सुशीलला चांदीचे देवाचे तामनाचे ताट
- ब्रॅण्डेड कपड्यांचा फुल पोशाख
(नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: वैष्णवीची आत्महत्या की खून? 'ही' गोष्ट निर्णायक ठरणार! डॉक्टरांनी सांगितली मोठी माहिती)
वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय
आरोपीचे वकील विपुल दुशिंग यांनी यावेळी मृत वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला. वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते. ते आम्ही पकडले होते. त्याची माहिती आम्हाला हवी आहे. आम्हाला न्याय हवा आहे, असा दावा हगवणे कुटुंबीयांनी केला आहे. वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिचे एका व्यक्तीसोबत चॅट पकडले होते. त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केला. एकदा उंदराचे औषध घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारुन जीव देण्याचा प्रयत्न तिने केला होता, असा दावा हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाने केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world