यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Vande-Bharat Express Accident News : मुंबई-सोलापूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला पुणे रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला असून गाडीचा एक डबा रुळावरून घसरल्याची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार,अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र,या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.रेल्वे प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी पथक पाठवून दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तांत्रिक बिघाड किंवा ट्रॅकशी संबंधित समस्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याबाबत सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे.
रेल्वे कुली,आरपीएफकडून प्रवाशांना मदत केली जात आहे. पुणे रेल्वे स्थानकापासून जवळपास 500 ते 1000 मीटर अंतरावर वंदे भारतचे चाक रुळावरून घसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना वंदे भारत ट्रेनमधून उतरून पुणे रेल्वे स्थानकावर उपलब्ध केलेल्या विशेष रेल्वे गाडीत सामानाच्या बॅगा घेऊन चालत जावे लागले.
नक्की वाचा >> Pune News: आयएलएस लॉ कॉलेजची बेकायदेशीरपणे शुल्क वसुली, सरकारने विद्यार्थ्यांच्या बाजूने घेतला मोठा निर्णय
रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार काय म्हणाले?
मुंबईहून सोलापूरला जाणारी वंदे भारत ट्रेन पुणे स्टेशनच्या तीन नंबर प्लॅटफॉर्मवर पोहोचत असताना सी-15 नंबर कोचची समोरील ट्रॉली घसरली आहे.जेवढेही प्रवासी आहेत, ते सर्व सुरक्षित आहेत.आमच्या एमरजन्सी टीमने तातडीनं काम सुरु केलं आहे, अशी प्रतिक्रिया रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील प्रसिद्ध ठिकाणी सुरु होता कुंटणखाणा, 'त्या' 3 महिलांचं कनेक्शन आलं समोर, पोलिसही हादरले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world