Palghar News : वसईत संतप्त नागरिकांनी महापालिका आयुक्तांची गाडी अडवली अन्..ऐन पावसाळ्यात नेमकं काय घडलंय?

वसईतील वाघराळ पाडा परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या वसई-विरार महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांच्या  वाहनाला भोयदापाडा येथील संतप्त नागरिकांनी अडवून आपल्या समस्या ऐकून घेण्याची मागणी केली.

जाहिरात
Read Time: 2 mins
Vasai Virar Municipal Corporation News Today

Vasai Virar Muncipal Corporation News : वसईतील वाघराळ पाडा परिसराची पाहणी करण्यासाठी आलेल्या वसई-विरार महापालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांच्या  वाहनाला भोयदापाडा येथील संतप्त नागरिकांनी अडवून आपल्या समस्या ऐकून घेण्याची मागणी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.भोयदापाडा येथील डंपिंग ग्राऊंडवर वसई-विरार शहरातील मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो.या कचऱ्यामुळे परिसरात कायम दुर्गंधी पसरत असून स्थानिक रहिवाशांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.सध्या सुरू असलेल्या पावसामुळे डंपिंग ग्राऊंडमधील दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी वाहून रस्त्यांवर तसेच घरांमध्ये शिरत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले अन्..

दरम्यान,आयुक्त वाघराळ पाडा परिसराची पाहणी करण्यासाठी आले असताना भोयदापाडा येथील रहिवाशांनी त्यांना डंपिंग ग्राऊंडची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली.मात्र आयुक्तांनी तेथे जाण्यास नकार दिल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी आयुक्तांचे वाहन अडवून आपल्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षक सस्पेंड, पोलिसी खाक्या दाखवताना कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल

स्थानिक नागरिकांनी केली मोठी मागणी

या प्रकारामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.स्थानिक नागरिकांनी डंपिंग ग्राऊंडमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा.तसेच पावसाळ्यात दूषित पाणी घरांमध्ये येऊ नये यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी स्थानिक रहिवाशी नम्रता वैती आणि अतुल मोटे यांनी केली आहे.