यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune PSI Viral Video : पुणे शहरातील एका कॅफेमध्ये घुसून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांशी बेजबाबदार वर्तन करणे, तसेच तोडफोड करणे पुणे पोलीस दलातील एका उपनिरीक्षकाला चांगलेच भोवले आहे. या गैरवर्तनाचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने तातडीने दखल घेत पोलीस उपनिरीक्षक (PSI) संदीप कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
नेमकं काय घडलं होतं?
मिळालेल्या माहितीनुसार,6 जून रोजी पोलीस उपनिरीक्षक संदीप कदम हे नाईट ड्युटीवर असताना त्यांनी पुणे शहरातील शिरोळे रोडवरील एका कॅफेमध्ये प्रवेश केला.कॅफेमध्ये गेल्यानंतर त्यांनी तेथील कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांशी अत्यंत अरेरावीची भाषा वापरली आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन केले.एवढ्यावरच न थांबता,कदम यांनी हातातील शासकीय काठीने कॅफेच्या काउंटरवरील कॉफीचे ग्लास आणि इतर खाद्यपदार्थ खाली पाडले.तसेच कॅफेमध्ये बसलेल्या ग्राहकांना तात्काळ उठून बाहेर जाण्यास धमकावले.
नक्की वाचा >> Pune News: पुणे शहरात शाळकरी मुली कशाबशा वाचल्या, अंगावर काटा आणणारा CCTV Video आला समोर
सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला अन्..
Pune | कॅफेमध्ये बेकायदेशीर तोडफोड, उपनिरीक्षकाला गैरवर्तन भोवलं | NDTV मराठी
— NDTV Marathi (@NDTVMarathi) July 1, 2026
कुठलीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता, कायदेशीर परवानगी असलेल्या एका कॅफेमध्ये घुसून तोडफोड केल्याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संदीप कदम यांना निलंबित करण्यात आले आहे. या तोडफोडीचा… pic.twitter.com/jffvO5fSAI
हा संतापजनक प्रकार कॅफेमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर पुणेकरांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.या घटनेमुळे पोलीस खात्याची जनमानसातील प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका उपनिरीक्षक संदीप कदम यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Mumbai Rain Video: कल्याण डोंबिवलीसह हा परिसर जलमय, शिळफाटा-मुंब्रा रोड पाण्याखाली, घरांमध्येही शिरलं पाणी
संदीप कदम यांचे हे वर्तन अत्यंत बेजबाबदार,पोलीस दलाच्या शिस्तीला बाधा आणणारे आणि खात्याला अशोभनीय असल्याचे निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world