Mumbai Rain : ...अन् BEST ची बस गेली 5 फूट खड्ड्यात; मुंबईकरांचं टेन्शन वाढलं!

मुंबईतील रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्यामुळे बेस्ट बसच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

जाहिरात
Read Time: 2 mins

पावसाळा सुरू होताच मुंबईची तुंबई होणं हे मुंबईकरांसाठी तसं नवीन नाही. काही महिन्यांपूर्वीच दुरुस्त केलेल्या रस्त्यांवर पुन्हा खड्ड्यांची रांग लागते. अनेकदा तर खड्ड्यात रस्ता शोधावा लागतो. मुंबईतील रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्यामुळे बेस्ट बसच्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईतील रस्त्यावरुन जात असताना ही बेस्टची बस चक्क पाच फूट खोल खड्ड्यात गेल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये बेस्ट बसचं मागचं चाक मोठ्या खड्ड्यात गेल्याचं दिसून येत आहे. यामुळे बस अडकून पडली आहे. अशी वेळी काय करावं असा प्रश्न चालक आणि कंडक्टरसमोर उभा राहिला आहे. 

गिरगावातील मेट्रो स्थानकाजवळ हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. रस्ता खचल्याने मोठा खड्डा झाला आणि यात बेस्टची बस गेली आहे. अद्याप मुंबईत नेहमीसारखा पाऊस सुरू झालेला नाही. त्याआधीच मुंबईतील रस्ते खचू लागल्याने नागरिकांना मोठं टेन्शन आलं आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Mumbai Rains Today: मुंबई पुढील 3 तास मुसळधार पावसाचा अंदाज, BMC ने शेअर केला हेल्पलाईन नंबर

मनसे नेत्याकडून संताप...


 

मुंबईत बेस्ट बस पाच फूट खड्ड्यात अडकल्याच्या घटनेवर नागरिकांसह राजकीय नेत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही या घटनेवरुन प्रशासनाला फटकारलं आहे. ते म्हणाले, प्रशासनाने मुंबईत सिमेंटचे रस्ते बांधले आहेत, मात्र त्या रस्त्याला बेस द्यायचा असतो. त्याचा पाया भक्कम करायला हवा. पण घाईघाईत या तांत्रिक गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं आहे. कंत्राटदाराला घाईघाईत काम करायला लावले. मग निकृष्ट दर्जाचा कारभार आहे. मे महिन्यात पाऊस पडला आणि तरीही कंत्राटदाराला पटापट काम करा असे सांगण्यात आले आहे. यांना लोकांचं जनतेचंं काहीही पडलेले नाही. 

Topics mentioned in this article