Nashik News: पत्नी माहेरी गेली, पतीचा संताप, थेट सिनेस्टाइल अपहरण, घटनेचा थरार CCTV त कैद

19 मार्चला कल्याणी आपल्या आईसह पांगरी इथं गेली होती. त्यांच्या बरोबर तिचा भाऊ ही होता. त्याच वेळी कल्याणीचा नवरा वैभव आपल्या मित्रांसह कार घेवून तिथं आला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नाशिक:

किशोर बेलसरे 

आधी प्रेम विवाह केला. मात्र त्यानंतर काही महिन्याचे पत्नीचेच अपहरण केले. ही धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये घडली आहे. पत्नीचे अपहरण पतीने आपल्या सासू समोरच केले. या अपहरणाचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अगदी सिने स्टाईल झालेल्या अपहरणानंतर मुलगी आणि तिचे कुटुंबीय हादरून गेले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कल्याणी दळवी ही 19 वर्षाची तरुणी आहे. तिने दोन महिन्या पूर्वी वैभव पवार या तरुणा बरोबर लग्न केलं होतं. तो सिन्नरच्या पांगरी इथला रहिवाशी आहे. या दोघांचा प्रेम विवाह होता. 20 जानेवारीला या दोघांचा विवाह झाला. त्यानंतर तिला तो मारहाण करायला लागला. त्यामुळे लग्न झाल्याच्या दुसऱ्याच महिन्यात 8 मार्चला ती माहेरी निघून आली. पत्नी माहेरी गेली हे वैभवला काही पटलं नाही. त्याला त्याचा प्रचंड संताप झाला. त्यातून त्याने पत्नीचेच अपहरण करण्याचा कट रचला. 

ट्रेंडिंग बातमी - शरीर संबध ठेवण्यासाठी पत्नी करायची पतीकडे 5 हजाराची मागणी , नकार दिला तर करायची असं काही की...

19 मार्चला कल्याणी आपल्या आईसह पांगरी इथं गेली होती. त्यांच्या बरोबर तिचा भाऊ ही होता. त्याच वेळी कल्याणीचा नवरा वैभव आपल्या मित्रांसह कार घेवून तिथं आला. कुणाला काही समजण्या आत त्यांनी कल्याणीवर झडप टाकली. तिला गाडीत कोंबलं. तिला सोडवण्यासाठी आई पुढे सरसावली. पण तिला ही मारहणा करण्यात आली. भावाला ही मारण्यात आलं. शेवटी कल्याणीला गाडीत टाकून तो तिथून पसार झाला. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Folk artist trouble: कला केंद्रांचा डान्सबार! लावणी सम्राज्ञीच्या आरोपाने खळबळ, घेतला मोठा निर्णय

बळजबरीने गाडीत टाकल्यानंतर वैभव तिला घेवून संगमनेरला नेले. पुढे बसने तो तिला लोणी इथं पर्यंत घेवून आला. शिर्डीच्या दिशेने पायी जात असताना त्यांच्यावर पोलिसांना संशय आला. त्या दोघांनाही पोलीसांना ताब्यात घेत पोलिस स्थानकात आणले. त्यानंतर कल्याणीने आपल्या बरोबर झालेली सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. कल्याणीच्या फिर्यादी वरून पोलिसांनी तीचा पती आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तापस पोलिस उपनिरीक्षक विजय कोठावळे,सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे,अधिक तपास तपास करीत आहेत