
पती बरोबर शरीर संबध ठेवण्यासाठी पत्नी पतीकडेच दररोज पाच हजार रुपयांची मागणी करत असेल तर? तुम्हाला यावर विश्वास बसला नसेल ना? तुम्ही म्हणाल असं कधी होवू शकतं का? पण हो अशी घटना घडल्याचे समोर आले आहे. बरं पाच हजार रुपये देण्यास पतीने नकार दिला तर ती त्या पेक्षाही भयंकर कृत्य करत होती. बंगळूरुमध्ये राहाणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाबरोबर अशी घटना घडली आहे. त्याने आपली पत्नी आणि तिच्या कुटुंबा विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर हा भयंकर आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या तक्रारीनंतर पोलिसही हैराणा झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पेशाने इंजिनिअर असलेला हा तरुण बंगळूरूमध्ये राहातो. त्याचे 14 ऑगस्ट 2022 साली लग्न झाले. लग्न जुळवणाऱ्या साईटवरून त्यांचे हे लग्न जुळले. मात्र लग्नाच्या आधीच होणारी पत्नी आणि सासूने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. सासूने आधी तीन लाख रुपये बँक अकाऊंटमध्ये मागवले. शिवाय 50 हजार कॅशही मागितली. है पैसे लग्नाच्या खर्चासाठी हवे असे सांगितलं. त्यानंतर या दोघांचे लग्न ही झाले. पण खरा ड्रामा यानंतर सुरू झाला.
लग्न झाल्यानंतर इंजिनिअर तरुणाला वाटलं आता आपलं आयुष्य सेट झालं आहे. आपण आता सुखाचा संसार करू. पण कसं काही झालं नाही. त्यांने दाखल केलेल्या तक्रारीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेतय. लग्नानंतर पत्नीने वैवाहीक जिवन सुरळीत चालेल असं काही केलं नाही. दोघांमध्ये ज्या वेळी शरीर संबधांचा विषय यायचा त्यावेळी त्याची पत्नी त्याच्याकडे प्रत्येक वेळी 5 हजार रुपयांची मागणी करायची. हे पाच हजार रुपये ती प्रत्येक वेळी मागत होती.
प्रकरण इथं पर्यंतच थांबत नाही. जर त्याने पैसे देण्यास नकार दिली तर ती आत्महत्या करण्याची धमकी देत होती. शिवाय सुसाईड नोटही लिहून ठेवत असत. पण इथं हे सर्व थांबत नव्हतं. या इंजिनिअर तरुणाने आणखी एक भयंकर आरोप पत्नीवर केला आहे. पत्नीने रागाच्या भरात पतीच्या प्रायवेट पार्टवरही हल्ला केला होता. त्याला जीवे मारण्याचाही तिने प्रयत्न केल्याचा आरोप इंजिनिअर पतीने केला आहे. ही मागणी केवळ शरीर संबध ठेवण्या पुरता मर्यादीत नव्हती.
पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांनी इंजिनिअर तरुणाकडे घर खरेदी करण्यासाठी 60 लाखांची मागणी केली होती. शिवाय दर महिन्याला 75,000 रुपयांचा हफ्ता ही त्याने भरावा यासाठी दबाव टाकला जात होता. पण या गोष्टीला नकार दिल्यावर पत्नी पतीला जोपर्यंत आमची मागणी पूर्ण करणार नाही तो पर्यंत शरीर संबध ठेवणार नाही असं सांगत होती. शिवाय वयाच्या 60 व्या वर्षानंतर मुलं होण्याचा विचार कर अशी धमकी ही त्याला देत होती. मला घटस्फोट हवा आहे अशी मागणी ही पतीने केली होती. त्यावर मला 45 लाख दे त्यानंतर घटस्फोट देते असंही ती त्याला सांगत होती. हे सर्व ऐकून इंजिनिअर तरुणाची स्थिती खराब झाली होती.
याचा फटका त्याच्या नोकरीच्या कामावर ही होत होता. तो वर्क फॉर्म होम करत होता. त्यावेळी त्याच्या ऑनलाईन मिटींगमध्ये पत्नी जाणीवपूर्वक अडचणी आणत होती. कामाच्या वेळी त्याच्या बरोबर वाद घालत होती. त्यामुळे त्याचा जॉब ही त्याच्या हातून गेला. मात्र पत्नीच्या या सर्व गोष्टी त्याने आपल्या मोबाईलमध्ये कैद केल्या. त्यानंतर पुरावा म्हणून त्यांनी तो पोलीसांना दाखवला. मात्र पतीने केलेले सर्व आरोप पत्नीने फेटाळून लावले आहेत. पती आपल्याला नोकराणी प्रमाणे वागवत होता. आपल्याल मारहाण करत होता. हुंड्यासाठी त्रास देत होता. जेवणासाठी चांगलं अन्न देत नव्हात. अशा स्थितीत मुलांना जन्माला कसं घालणार असं तिने सांगितलं आहे. पतीने तक्रार केल्यानंतर पत्नीला पोलीसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यावर आता आपल्याला वैवाहीक जिवनात काहीच रस नाही. दरम्यान जोपर्यंत आपला घटस्फोट होत नाही तोपर्यंत आपल्याला संरक्षण द्यावं अशी विनंती आत पतीने केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world