Trending News: मराठमोळ्या लेकीनं रचला इतिहास! फायर ब्रिगेडला मिळाली पहिली महिला फायर इंजिन ड्रायव्हर, Video

पल्लवी यांना 6 वर्षांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती देखील फायर इंजिन ड्रायव्हर आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई अग्निशामक दलाला (Mumbai Fire Brigade) पहिली महिला फायर इंजिन ड्रायव्हर मिळाली आहे. पल्लवी पाटील असं त्याचं नाव आहे. पल्लवी या 29 वर्षाच्या आहेत. त्यांनी मुंबई अग्नशमन दलात पहिली महिला फायर इंजिन ड्रायव्हर बनण्याचा मान मिळवला आहे. पल्लवी यांचे भाऊ आधीपासूनच अग्निशामक दलात कार्यरत आहेत. तर  वडिलांच्या प्रेरणेने त्यांनी या क्षेत्रात पाऊल ठेवल्याचं त्या सांगतात. 2017 मध्ये त्यांनी यापदासाठी कठीण परीक्षा दिली होती. त्यात त्या पास झाल्या. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी अग्निशमन दलात प्रवेश केला होता.

गेली 8 वर्षे पल्लवी फायरफाइटर म्हणून काम करत होत्या. त्यानंतर त्यांनी फायर इंजिन चालवण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले. विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांनी 3 मोठ्या आगीच्या घटनांमध्ये यशस्वी कामगिरी बजावली आहे. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांवरून अवजड फायर इंजिन चालवणे हे एक मोठे आव्हान असते. शिवाय घटनास्थळी पाण्याचा दाब नियंत्रित करणे, अशा दोन्ही आव्हानात्मक जबाबदाऱ्या असतात. पण त्यांनी ही कामगिरी यशस्वी पणे पार पाडली आहे. 

Advertisement

नक्की वाचा - Mahabaleshwar: महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना आता 'या' पॉईंटवर नो एट्री, 'हे' कारण ठरलं कारणीभूत, अटी नियम लागू

पल्लवी यांना 6 वर्षांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे त्यांचे पती देखील फायर इंजिन ड्रायव्हर आहेत. मुलाची काळजी घेण्यासाठी हे दाम्पत्य आपल्या ड्युटीच्या वेळा सांभाळतात. ड्युटी आणि कुटुंब असं या दोघांनी ताळमेळ जुळवून आणला आहे. अग्निशमन दलाची वर्दी घातल्यानंतर केवळ लोकांचे प्राण वाचवणे हेच आपले मुख्य ध्येय असते, असे पल्लवी अभिमानाने सांगतात. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या फायर इंजिन चालवतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांच्या या जिद्दीला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे.

नक्की वाचा - Siya Goyal: सियाच्या जन्माची कहाणी! जन्म पण असा की गोयल दाम्पत्याला करावा लागला होता मोठा त्याग

त्यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यात त्यांनी नारी शक्तीला सलाम असे म्हटले आहे. हीच खरी महिलांची शक्ती आहे असं ही काही जणांनी सांगितलं. प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी असं ही काही युजर्स म्हणाले आहेत. एक जण हा व्हिडीओ पाहून म्हणतो की हा क्षण खरोखर गर्वाचा आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय पल्लवी यांच्यावर कौतूकाचा वर्षाव ही होत आहे.