जाहिरात

Mahabaleshwar: महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना आता 'या' पॉईंटवर नो एट्री, 'हे' कारण ठरलं कारणीभूत, अटी नियम लागू

पर्यटकांना संध्याकाळी गेट बंद होण्यापूर्वी आपली वाहने बाहेर काढणे बंधनकारक राहणार आहे.

Mahabaleshwar: महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना आता 'या' पॉईंटवर नो एट्री, 'हे' कारण ठरलं कारणीभूत, अटी नियम लागू
  • महाबळेश्वरमधील विल्सन पॉईंटवर पर्यटकांच्या चुकीच्या वर्तनामुळे वन विभागाने कठोर निर्बंध लागू केले आहेत
  • सूर्यास्तानंतर विल्सन पॉईंट पूर्णपणे बंद केला जाईल आणि तो फक्त सूर्योदयाच्या वेळी उघडला जाईल
  • रात्रीच्या वेळी दारू पिणे, पार्ट्या करणे यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
सातारा:

देश विदेशातले पर्यटक मोठ्या प्रमाणात महाबळेश्वरला फिरायला येत असतात. थंडगार वातावरण आणि मनमोहक निसर्ग यामुळे लाखो पर्यटकांची पसंती ही महाबळेश्वरला असते. महाबळेश्वर मध्ये अनेक पॉईंट्स आहेत. ते पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असता. पण अनेक पर्यटक इथं पर्यटना पेक्षा बाकीच्या उचापती करत असतात. त्याच फटका निसर्गाला बसतो. त्यामुळे सातार वन विभागाने काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्या दुष्टीने महत्वाचा विल्सन पॉईंटवर जाताना काही निर्बंध लादले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

विल्सन पॉईंट हा महाबळेश्वर मधील महत्वाचा पॉईंट आहे. मात्र इथं पर्यटकांकडून काही चुकीच्या गोष्टी होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे  मुख्य प्रेक्षणीय स्थळ वगळता सभोवतालच्या कोअर वनक्षेत्रात पर्यटकांना प्रवेश करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट वन अधिनियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे या भागात होणाऱ्या चुकीच्या गोष्टी रोखण्याचा वन विभागाचा उद्देश आहे. याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. 

नक्की वाचा - Siya Goyal: सियाच्या जन्माची कहाणी! जन्म पण असा की गोयल दाम्पत्याला करावा लागला होता मोठा त्याग

​विल्सन पॉईंटवरून सुर्यास्त पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. हा पॉईंट त्यासाठीच ओळखला जातो. सूर्यास्तानंतर ही इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक थांबतात. आता सूर्यास्तानंतर हा पॉईंट पूर्णपणे बंद केले जाणार आहे. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीच तो उघडला जाईल. रात्रीच्या वेळी या शांत परिसरात लपून-छपून दारू पिणे, पार्ट्या करणे आणि धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले होते. या वाढत्या प्रकारांमुळे वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती, भेकवली यांनी हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना संध्याकाळी गेट बंद होण्यापूर्वी आपली वाहने बाहेर काढणे बंधनकारक राहणार आहे.

नक्की वाचा - Siya Goyal Viral Video: सियाचा आणखी एक व्हिडीओ समोर, या Video मध्ये तर कहर केला, आई- वडीलांचा दावा...

​वन्यजीवांना संभाव्य संसर्गाचा धोका टाळण्यासाठी परिसरात पाळीव प्राणी आणण्यास सक्त मनाई आहे. तसेच, दऱ्या आणि जंगलांचे चित्रीकरण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रोन कॅमेऱ्यांमुळे वन्यप्राणी व पक्षी भयभीत होत असल्यामुळे ड्रोन उडवण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. नियम डावलल्यास ड्रोन थेट जप्त केला जाईल. वन्यप्राण्यांना मानवी खाद्यपदार्थ देणे आणि प्लास्टिक कचरा करणे यावरही निर्बंध घालण्यात आले असून पर्यटकांनी वन संपदेचे रक्षण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन वन प्रशासनाने केले आहे.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com