Viral Video: धावत्या कारमधून फोडले 288 फटाके, कुख्यात गुंडाचा थेटे सेनेच्या आमदाराशी संबंध

सकाळी त्याने KGF चित्रपटातून प्रेरित व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

दिवाळी झाली आहे. पण या काळात झालेले कारनामे आता समोर येत आहेत. एका कुख्यात गुंडाने चक्क धावत्या कारमधून फटाके फोडण्याचा धडका लावला होता. त्याने एक दोन नाही तर चक्क 288 फटाके फोडल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या गुंडाचा संबंध थेट शिवसेनेच्या आमदारा सोबत जोडला जात आहे. त्याचे फोटो ही या आमदारासोबत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची दाट शक्यता आहे. 

सज्जू मलिक असं या गुन्हेगाराचं नाव आहे. त्याचा हा फटाके फोडण्याचा धिंगाणा समोर आला आहे. कारमधून त्याने 288 फटाके फोडले. त्यामुळे भर रस्त्यावर ठिणग्यांची बरसात पाहायला मिळाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा सज्जू मलिक हा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत यांच्या जवळचा सहकारी मानला जातो. त्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

नक्की वाचा - Kalyan News: कल्याण पोलिसांनी गुन्हेगारांचा उतरवला माज! मध्यरात्री कल्याण डोंबिवलीत काय घडलं?

सकाळी त्याने KGF चित्रपटातून प्रेरित व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. त्यानंतर आता आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या नव्या व्हिडिओमध्ये सज्जू मलिक कारमध्ये बसलेला असून त्याचा चालक कार चालवत असताना 288 शॉटचे फटाके पेटवताना दिसतो. हे फटाके थेट रस्त्यावर धावणाऱ्या OLA आणि Uber वाहनांकडे फेकले जातात. ज्यामुळे CNG वाहनांना मोठा स्फोटाचा धोका निर्माण झाला होता. हा प्रकार जीवावर बेतू शकतो," असे नागरिकांचे म्हणणे असून पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

नक्की वाचा - Oil on Navel: नाभीवर तेल लावण्याचे फायदे! योग गुरुंनी सांगितले कोणते तेल उपयुक्त

त्यामुळे या प्रकरणी आता सज्जू मलिक याच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशा पद्धतीने फटाके फोडून मजेच्या जीवावर दहशत पसरवण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण तर निर्माण झालेच पण त्यातून नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. अशा स्थितीत आता गुन्हा जरी दाखल झाला असला तरी मुंबई पोलीस याबाबत काय ठोस कारवाई करतात हे पाहावं लागेल. 

Advertisement