Virar News : 'बाई गेल्या'; भररस्त्यात पडला होता शिक्षिकेचा मृतदेह, ZP शाळेचे विद्यार्थी हळहळले

या दुर्दैवी घटनेमुळे तिल्हेर शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे

जाहिरात
Read Time: 2 mins

Virar News : मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथे घडलेल्या भीषण अपघातात एका महिला शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. स्वीडल गोम्स (वय ४०) असं या मृत शिक्षिकेचं नाव आहे. त्या वसई तालुक्यातील निर्मळ गावच्या रहिवासी असून या तिल्हेर येथील म्हस्कर पाडा जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

विद्यार्थ्यांकडून हळहळ...

शनिवारी सकाळी शाळेकडे जात असताना बसस्टॉपकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या हायवा ट्रकने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात त्या जागीच मृत्युमुखी पडल्या. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी पाठवला.

Advertisement

नक्की वाचा - Buldhana News : 'माझी वाट पाहू नका'; शेअर बाजारात ट्रेडिंगमध्ये एक चूक; गणेशच्या निर्णयाने कुटुंबाची वाताहत


या दुर्दैवी घटनेमुळे तिल्हेर शाळेतील विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महामार्गावर वेगाने धावणारे आणि क्षमतेपेक्षा अधिक माल वाहून नेणारे हायवा ट्रक यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक पोलिसांकडून याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. 

Topics mentioned in this article