जाहिरात

मुंबईत गारठा वाढला, नागरिकांनी अनुभवली 9 वर्षांनंतरची सर्वात थंड रात्र

Mumbai Temperature : मुंबईत याआधी 24 डिसेंबर 2015 रोजी मुंबईचे तापमान 11.4 अंश सेल्सिअसवर घसरले होते. तर 20 डिसेंबर 1949 रोजी किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होते, जो आजपर्यंतचा विक्रम आहे.

मुंबईत गारठा वाढला, नागरिकांनी अनुभवली 9 वर्षांनंतरची सर्वात थंड रात्र

मुंबईकर सध्या कडाक्याच्या थंडीची अनुभव घेत आहेत. मागील आठवड्यात गायब झालेल्या थंडीने पुनरागमन केलं आहे. रविवारी रात्री मुंबईकरांना रेकॉर्डब्रेक थंडी अनुभवली. रविवारी किमान तापमान 13.7 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, गेल्या 9 वर्षांतील डिसेंबरमधील हे सर्वात कमी तापमान आहे. मुंबईत पुढील दोन दिवस थंडी कायम राहणार असून रात्रीचे तापमान 14 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

(नक्की वाचा-  CCTV Footage : कुर्ल्यात भरधाव बेस्ट बस गर्दीत शिरली, 5 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी)

मुंबईत याआधी 24 डिसेंबर 2015 रोजी मुंबईचे तापमान 11.4 अंश सेल्सिअसवर घसरले होते. तर 20 डिसेंबर 1949 रोजी किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं होते, जो आजपर्यंतचा विक्रम आहे.

फेंगल वादळाने गायब झाली होती थंडी 

मागील आठवड्यात फेंगल वादळाचा दक्षिम किनारापट्टीला तडाखा बसला होता. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवला होते. चक्रीवादळामुळे मुंबईच्या तापमानात देखील वाढ झाली होती. मुंबईत तापमानाचा पार 35 ते 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. 

(नक्की पाहा-  कुर्ल्यातील अपघाताची भीषणता दाखवणारे Photos)

मात्र फेंगल वादळाचा प्रभाव कमी झाल्यानंतर थंडीने पुन्हा मुंबईत कमबॅक केलं आहे. शनिवारपासूनच मुंबईतील तापमानात घसरण सुरू झाली होती. येत्या काही दिवसात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com