जाहिरात

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; किनारपट्टी भागाला आज आँरेज अलर्ट, राज्यभर कशी असेल स्थिती?

Rain Alert For maharashtra : रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; किनारपट्टी भागाला आज आँरेज अलर्ट, राज्यभर कशी असेल स्थिती?

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईत अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आज देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. राज्यभर आज पावसाची स्थिती कशी असेल, याबाबत माहिती घेऊया. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट

अरबी समुद्रात देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा इशारा हवामान खात्याना दिला आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात आँरेज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण-गोव्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा - मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; ठाणे ते CSMT लोकल सेवा ठप्प, प्रवाशांचे हाल)

रत्नागिरी, साताऱ्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज 

रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यात निर्जन ठिकाणी होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा 40-50 किमी प्रतितास वेगाने येण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा - कोकणात मुसळधार! राजापूर शहराला पुराचा वेढा, सिंधुदुर्गातही पावसाची जोरदार बॅटींग)

उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यातील निर्जन ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा 30-40 किमी ताशी वाहण्याची शक्यता आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com