Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून काही प्रमाणात होणाऱ्या उकाड्याने आणि थंडीने अशा मिश्रित वातावरणामुळे हैराण झालेल्या मुंबईकर आणि ठाणेकरांना आज अचानक आलेल्या पावसाने सुखद धक्का दिला, तर अनेकांची तारांबळही उडाली. जानेवारी महिन्यात पडलेल्या या अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला, तरी हवामान खात्याने हा बदल अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.
महिना अखेरीस पुन्हा पावसाची शक्यता...
हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, हा पाऊस पडण्यामागे काही प्रमुख महत्वपूर्ण कारणे आहेत. हिमालयीन प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे त्याचसोबत जोरदार वारे, काही ठिकाणी दाट धुके, उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीची लाट आणि थंड दिवसांची परिस्थिती आणि लगतच्या समुद्रांवर वादळी वारे या काही कारणांमुळे कमी दबावाचा पट्टा तयार झाला आणि हलक्या सरी बरसल्या.
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाची निवडणूक लांबणीवर! भाजपला कसा होणार फायदा?
३० जानेवारीच्या रात्रीपासून आणखी एकदा ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे कारण पश्चिम दिशेकडून येणारे वारे ज्याला वेस्टर्न डिस्टरबन्स असं म्हटलं जातं. ज्यामुळे महिन्याच्या अखेरीस अस्थिर हवामान कायम राहू शकते असे सूचित होते. परंतु हे वारे हळू हळू पुढे सरकत असल्याने त्याचा फार काळ परिणाम महाराष्ट्रात दिसून येणार नाही.
मुंबईकरांची झाली तारांबळ..
आज एक दिवस हलक्या सरी बरसल्या मात्र महिन्याअखेरीस देखील हीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यात सोबत हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्या मुंबईत तापमान घटनेची शक्यता आहे. सकाळी मुंबईत कारवा पसरेल ज्यामुळे वातावरणात पुन्हा बदल होतील. सकाळच्या सत्रात आकाश ढगाळ होते आणि काही भागात हलक्या सरी कोसळल्या ठाणे आणि कल्याण परिसरातही पावसाचा जोर दिसून आला. अचानक आलेल्या पावसामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची आणि शाळेतून परतणाऱ्या मुलांची धावपळ झाली.
(नक्की वाचा- Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप, कोण-कोणत्या बँका होणार सहभागी? काय आहेत मागण्या?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world