ठाणे, पुण्यासह राज्यातील अनेक भागांत आज अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील 20 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावासाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक ठिकाणी असंच वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळे काही प्रमाणात उष्णतेपासून आराम मिळू शकतो. मात्र काही कालावधीनंतर आकाश पुन्हा निरभ्र होईल आणि तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.
(नक्की वाचा - LPG Price Cut: सर्वसामान्यांना दिलासा; LPG सिलेंडरच्या दरात 41 रुपयांची कपात)
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
आज 1 एप्रिल 2025 रोजी, ठाणे, रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागने पावसाचा यलो अलर्ट जारी केली आहे.
अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे कोकणातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. दरम्यान पावसाच्या शक्यतेमुळे कोकणात काढणी केलेला आंबा, काजू बी, कडधान्ये, व सुपारी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
(नक्की वाचा - Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरचा प्रवास 1 एप्रिलपासून महागणार, काय आहेत नवे दर?)
यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनच्या वतीने सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज या पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.