जाहिरात

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरचा प्रवास 1 एप्रिलपासून महागणार, काय आहेत नवे दर?

11 डिसेंबर 2022 पासून या महामार्गासाठी लागू असलेल्या पथकरात आता 01 एप्रिल 2025 पासून 19 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे.

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरचा प्रवास 1 एप्रिलपासून महागणार, काय आहेत नवे दर?
नागपूर:

समृद्धी महामार्गावरील प्रवास 1 एप्रिलपासून महागणार आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना आता 19 टक्के अधिक टोल द्यावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला एक एप्रिलपासून चाट बसणार आहे. नागपूर मुंबई प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर व्हावा यासाठी समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला आहे. या महामार्गावरून प्रवासाचा वेळ  मोठ्या प्रमाणात वाचण्यास मदत होती आहे. असं असलं तरी हा प्रवास आता महागणार आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

    नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. या महामार्गासाठी जवळपास 65 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. देशातील सर्वात लांब पल्ल्याचा द्रुतगती महामार्ग म्हणून या महामार्गाची ओळख आहे. 11 डिसेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आहे. सध्या 701 किमी पैकी 625 किलोमीटरचा महामार्ग हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. 

    ट्रेंडिंग बातमी - Pune News: होणार नवरा पसंत नाही, नवरीने दिली दीड लाखांची सुपारी, शेवटी जे काही झालं ते...

    11 डिसेंबर 2022 पासून या महामार्गासाठी लागू असलेल्या पथकरात आता 01 एप्रिल 2025 पासून 19 टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे एक एप्रिलपासून नवे दर लागू होणार आहेत. हलक्या वाहनासाठी आता 1 हजार 287 रुपये द्यावे लागणार आहेत. आधी ते 1 हजार 081 रुपये द्यावे लागत होते. हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी 2075 रुपये मोजावे लागणार आहेत. आधी या वाहनांसाठी 1743 रुपये द्यावे लागत होते. 

    ट्रेंडिंग बातमी - Walmik Karad : बीड कारागृहात वाल्मीकच बॉस? 'ते' कैदी बाहेर येताच धडाधड बोलले

    बस  आणि ट्रकसाठी आधी 3 हजार 656 रुपये द्यावे लागत होते. आता नव्या दरानुसार या वाहनांना समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना 4 हजार 356 रुपये द्यावे लागतील. त्याच बरोबर अवजड वाहनांकडून  5 हजार 737 ऐवढा टोल घेतला जात होता. आता नव्या दरानुसार त्यांना 6 हजार 831 रुपये द्यावे लागणार आहेत. तर अति अवजड वाहनांना 6 हजार 981 रुपये द्यावे लागत होते ते आता 8 हजार 312 रुपये द्यावे लागणार आहेत. हा टोल नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटरसाठी आहे.