Rohit Arya Letter Viral : मुंबईच्या पवई परिसरात ऑडिशनला गेलेल्या अल्पवयीन 17 लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर केला. पोलिसांनी आरोपी रोहितला आत्मसमर्पण करायला सांगितलं होतं, पण त्याने पोलिसांवर फायरिंग केली होती, असं म्हटलं जात आहे. आरोपीने पोलिसांवर फायरिंग केल्यावर पोलिसांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. दरम्यान, पोलिसांच्या गोळीबारीत रोहित आर्याचा मृत्यू झाला. सूत्रांच्या माहितीनुसार, रोहितचे सरकारी प्रकल्पांमध्ये पैसे अडकले होते, त्यामुळे त्याने लहान मुलांना वेठीस धरलं होतं. अशातच रोहित आर्याचं एक खळबळजनक पत्र व्हायरल झालं आहे.
रोहित आर्याने पत्रात काय म्हटलंय?
" २०१३ पासून Project Let's Change (PLC) करत आहे; महाराष्ट्र शुभारंभ मा. मुख्यमंत्री (श्री देवेंद्र फडणवीस) यांने २०१५ मध्ये केला होता. २०२२ - PLC च्या स्वच्छता मॉनिटर टप्प्याची संकल्पना केली. Social Entrepreneur असल्याने स्वखर्चावर ५००० + शाळांमध्ये राबवून प्रभाव आणि परिणाम सिद्ध केला.२०२३-२४ - माझ्या प्रस्तावाला मान्यता मिळाली, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा मध्ये सर्वाधिक गुणांचे महत्व दिले, मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांने PLC स्वच्छता मॉनिटर अभियान लोकार्पण केले. संकल्पना माझी, प्रभावी सिद्ध करण्यासाठी गुंतवणूक माझी, अभियानाचे नाव माझे, प्रस्ताव माझा, अंमलबजावणी साठी कष्ट माझे, परंतु पैसे भलत्यालाच?
नक्की वाचा >> रामायण, हनुमान अन् नरसिंहाचा अवतार..आता 'या' अभिनेत्रीनं दाखवला रुद्रावतार! महाकालीचा पोस्टर पाहून धडकीच भरेल
गडबड point out केल्यावर काम करत असताना मध्येच जाणून गोंधळ केले गेले.२०२४-२५ - प्रस्ताव दिला असूनही मला संपर्क न करता माझ्या स्वच्छता मॉनिटर अभियानाला परस्पर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा २०२४-२५ शामिल केले. न्याय मिळण्यासाठी तब्बल ३ महिने उपोषण झाल्यावर साधारण केवळ २५% payment वैयक्तिक cheques द्वारे मंत्री महोदयांने केले. बाकी payment पुढील ३ वर्षे PLC स्वच्छता मॉनिटर प्रस्तावाला मान्यते सोबत देण्याचे आश्वासन दिले. प्रधान सचिव, मा. मंत्री श्री दादाजी भुसे यांना भेटण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ झाले. न्याय मिळवण्यासाठी पुन्हा उपोषण खेरीज गत्यंतर दिसत नाही.

नक्की वाचा >> Mamata Kulkarni Video: ममता नाही तर 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री होती डी कंपनीची खासमखास
कोण होता रोहित आर्या? धक्कादायक माहिती आली समोर
रोहित आर्या पुण्यातील एक सामाजिक कार्यकर्ता होता, असं सांगितलं जात आहे. त्याने ऑगस्ट 2024 मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात रोहित आर्याने उपोषण केलं होतं आणि त्यावेळी त्याला अचानक फिट आली होती. फिट आल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माझी शाळा, सुंदर शाळा या प्रकल्पाचे डिझाईनही त्यानेच केल्याचा दावा रोहितने केला होता. पण त्याची दखल घेतली नसल्याने त्याने सरकारच्या विरोधात आंदोलन केले होते. रोहित आर्याने अनेक सरकारी योजनांमध्ये पैशांची गुंतवणूक केली होती. यात त्याचा मोठा नुकसान झाला होता. यासाठी तो सरकार आणि संबंधीत विभागाला जबाबदार धरत होता. यासाठी त्याने सरकारशी संवाद साधण्यासाठी आणि स्वत:चा बचाव करण्यासासाठी हे खतरनाक पाऊल उचललं, अशी माहितीही समोर आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world